- 💥आतापर्यंत जिल्ह्यात 3656 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे💥
औरंगाबाद, दि. 22 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1408 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 126 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3656 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बारी कॉलनी (1), वाळूज (3), गजानन नगर (3), गजगाव, गंगापूर (1), न्याय नगर, गारखेडा परिसर (1), मयूर नगर (3), सुरेवाडी (1), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (2), भाग्य नगर (5), एन अकरा, सिडको (2), सारा वैभव, जटवाडा रोड (2), जाधववाडी (4), मिटमिटा (3), गारखेडा परिसर (3), एन सहा, संभाजी पार्क (1), उस्मानपुरा (1), बजाज नगर, वाळूज (3), आंबेडकर नगर, एन सात (1), भारत नगर, एन बारा, हडको (1), उल्का नगरी, गारखेडा (1), नॅशनल कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), संभाजी कॉलनी (1), आनंद नगर (1), आयोध्या नगर, सिडको (1), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (3), संत ज्ञानेश्वर नगर (1), राजे संभाजी कॉलनी (4), मुकुंदवाडी (1), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (1), काल्डा कॉर्नर (1), एन सहा, मथुरा नगर (1), नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा (4), एन अकरा (2), टीव्ही सेंटर (4), सुदर्शन नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (5), जय भवानी चौक, बजाज नगर (2), महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (3), फुले नगरी, पंढरपूर (3), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (1), करमाड (3), मांडकी (2), पळशी (4), शिवाजी नगर, गंगापूर (4), भवानी नगर, गंगापूर (1), कटकट गेट (2), जय भवानी नगर (1), लोटाकारंजा (1), यशराज आंगण, हर्सुल सावंगीजवळ (1), एन नऊ, संत ज्ञानेश्वर नगर, हडको (1), मुजीब कॉलनी, रोशन गेट (1), न्यू उस्मानपुरा, क्रांती चौक (1), सिंधी कॉलनी (1), गोरख कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), पालखेड, वैजापूर (1), शिवाजी कॉलनी (1), सिडको (1), पद्मपुरा (2), एन नऊ, शिवाजी नगर, सिडको (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), दारूसालार मोहल्ला, पैठण (1), जयसिंगपुरा (1), शताब्दी नगर, हडको (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 54 स्त्री व 72 पुरुष आहेत.
*आतापर्यंत 2046 जण कोरोनामुक्त*
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
*घाटीत आठ, खासगी रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 21 जून रोजी दुपारी 3.15 वाजता रोशन गेट येथील 73 वर्षीय पुरूष, संध्याकाळी सात वाजता गारखेडा येथील 70 वर्षीय पुरूष, रात्री आठ वाजता कैसर कॉलनीतील 25 वर्षीय स्त्री, रात्री दहा वाजता हनुमान नगर, पुंडलिक नगर येथील 36 वर्षीय स्त्री, रात्री अकरा वाजता सिल्लोड येथील 55 वर्षीय पुरूष, 22 जून रोजी पहाटे 3.45 वाजता राजा बाजार येथील 62 वर्षीय पुरूष, सकाळी 7.45 वाजता उत्तम नगरातील 49 वर्षीय पुरूष आणि सकाळी दहा वाजता कोहिनूर कॉलनीतील 59 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीमध्ये 151 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 148 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते.
शहरातील एका खासगी रुग्णालयात 21 जून रोजी रात्री 11.30 वाजता एन नऊ सिडकोतील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा, 22 जून रोजी सकाळी 8.15 वाजता हर्सुल परिसरातील 71 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष, पैठण गेट येथील 31 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा सायंकाळी 6.45 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 148, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 53, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 202 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे...
0 टिप्पण्या