💥नांदेड मध्ये कोरोनाचा वाढता सातत्याने कहर सुरूच; आज 14 नव्या रुग्णांची भर...!



 💥जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 280 वर💥

नांदेड (16 जून ): जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने देशासह  राज्यात धुमाकूळ घातला असून  नांदेडकरांच्याही  चिंतेतही  दिवसोंदिवस भर पडत आहे . शहरात रविवार व सोमवारी कोरोनाने थोडीशी  साखळी तोडलेली असताना मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये मात्र नव्याने 14 रग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता  280 वर पोहोचला आहे. 

आज 16 जून रोजी 180 नमून्यांचा अहवाल आला आहे. यामुळे  मनपाच्या हद्दीमध्ये आता 14 नव्या  रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी रात्री 118 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला होता. यामध्ये एकटया मुखेडमधील विठ्ठल मंदिर परिसरातील यापूर्वीच्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नव्याने चार रुग्णांची भर पडली होती. आणि त्यामुळे रुग्णसंख्या 266 झाली होती. मात्र आता यात महापालिकेच्या हद्दीतील 14 रुग्ण वाढले, असल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 280 वर पोहचली आहे. यामध्ये त्या महिला बँकेच्या कर्मचार्‍यांच्या संपर्कातील बारा जणांचा समावेश आहे.  तर आता जिल्ह्यातील एकूण 280 कोरेाना रुग्णांपैकी आतापर्यंत 177 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत . तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या