💥पूर्णा तालुक्यातील ताडकळस हद्दीतील पिंपरी देशमुख येथे विशेष पथकाची गावटी दारू अड्यावर धाड...!



💥धाडसी कारवाईत १२० लिटर हातभट्टी दारू बनविण्यासाठी लागणारे रसायनासह अन्य साहित्य जप्त💥

पूर्णा/तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथे आज दि.०५ मे रोजी ०२-१५ वाजेच्या सुमारास गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळताच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशावरून आरोपीच्या राहत्या घरी प्रॉव्हिबीषण रेड करण्यात आली.
दरम्यान या छाप्यामध्ये १२० लिटर हातभट्टी दारू तयार करण्या करीता लागणारे रसायन ज्यात नवसागर मोहाचे व बिब्याचे फुल असा एकूण मिश्रित रसायन साठा ज्याची एकूण किंमत ९ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून आरोपी विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही  जिल्हा पोली अधिक्षक मा.कृष्णकांत उपाध्याय,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती राग सुधा मॅडम स्थागुशाचे स.पो.नि. एच.जी.पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील एएसआय हनुमान कच्छवे,पोहेकॉ.सखाराम टेकुळे,पोहेकॉ.जगदिश रेड्डी,पो.कॉ श्रीकांत घनसावंत पो.कॉ घनसावं,पो.कॉ अतुल कांदे ,म पो.कॉ पूजा भोर्गे, चालक पो.कॉ गजेंद्र चव्हाण आदीनि मिळून कार्यवाही केली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या