💥आत्महत्या की घातपात पोलीस तपास सुरू💥
परभणीः वसमत रस्त्यावरील पुर्णा नदीवरील रहाटी येथील पाञात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला.
तो मृतदेह बाहेर काढण्याचं काम दुपारी बारा वाजता सुरू होतं.अशी माहिती प्रत्यक्ष दर्शनी व्यक्तीने दिली.
रहाटी पुलावर एक मोटारसायकल आढळून आली, मृत पावलेल्या युवकांचीच ती मोटारसायकल असावी,
अन् तो परभणीचा,पोलिस वसाहत परिसरांतील राहिवाशी असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी धावून गेले आहेत. पुलावर बघ्याचीही मोठी गर्दी उसळली.
त्या युवकांनी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली का अन्य काही प्रकार आहे याविषयी पोलिसांनी अंदाज घेवून तपासणी सुरू केली आहे...
0 टिप्पण्या