💥नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस कर्मचारी यांना फेसशिल्ड मास्कचे वाटप...!



💥राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले मास्कचे वाटप💥

नांदेड/जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ,मुंबईच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या मार्गदर्शना खाली नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक श्री संदिप शिवले,इतवारा पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक श्री नरवाडे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे श्री नाटुरे,विमानतळ पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक श्री ननावरे, भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पो.नि.श्री साळुंके,व सपोनि.श्री चव्हाण,व ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक श्री कच्छवे यांच्याशी संपर्क साधून शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने त्या भागाला प्रशासनाच्या वतीने कंटेन्मेंट झोन घोषित केलेल्या ठिकाणी सेवा देणारे पोलीस कर्मचारी यांना नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मुबई च्या तर्फे फेसशिल्ड  मास्क वाटप करण्यात आले. 

        यावेळी नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बंटी लांडगे, सरचिटणीस गणेश तादलापूरकर, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष राहुल जाधव, अल्पसंख्याक विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, डॉ मुजाहिद खान,वक्ता सेल चे अध्यक्ष एकनाथ वाघमारे, रा.युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मनबीरसिंग ग्रंथी,शहर सचिव,शफी उर रहेमान,युनूस खान,सा. न्या. विभागाचे उपाध्यक्ष बच्चू यादव, श्रीधर नागापूरकर,पाशाखान तांबोळी  जिलनी पटेल प्रकाश घोगरे,अमोल मुराळकर गंगाधर मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या