💥उद्धव ठाकरेंमधील बदलानं ओमर अब्दुल्लांही प्रभावित, एका 'शब्दात' केलंय कौतुक...!💥महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळतय ते कौतुकास्पद💥 

मुंबई/कोरोना व्हायरसने अख्ख्या जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसतोय. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. हा आकडा चिंता वाढवणारा असला तरी राज्य सरकार अगदी खंबीरपणे आणि अतिशय संयमाने स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधत आहेत. अनेक पातळ्यांवर लढत आहेत. ते ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत, ते पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरेंच जाहीर कौतुक करत, त्यांना कडक सॅल्युट ठोकला. तर, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही एकाच वाक्यात उद्धव ठाकरेंच्या कार्याचं कौतुक केलंय. उद्धव ठाकरेंमध्ये जाणवेला बदल त्यांनी लक्षवेधी असल्याचं म्हटलंय.
‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. जावेद अख्तर त्यांच्या परखडपणासाठी ओळखले जातात. अगदी अलीकडे त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मशिदींमध्ये नमाज पठण सुरु असल्यावरून टीका केली होती. काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन करत आहेत. तरीही, लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे नॅशनल कॉन्फरेन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही उद्धव ठाकरेंच्या बदलाबाबत कौतुक केलंय.
ओमर अब्दुल्ला यांनी चक्क उद्धव ठाकरेंमधील बदल हा करिश्मा किंवा अविष्कार असल्याचं म्हटलंय. Uddhav thackeray has been revelation असे म्हणत ओमर यांनी उद्धव ठाकरेंच्या कोरोना लढाईतील भूमिकेचं कौतुक केलंय. अविष्कार किंवा प्रगटीकरण या एका शब्दात उद्धव ठाकरेचं कौतुक अब्दुल्ला यांनी केलंय.
*उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होतं.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या