💥राजधानी दिल्लीत भूकंपाचा धक्का...!



💥संध्याकाळी ५.५० मिनिटांनी बसला भूकंपाचा सौम्य धक्का मनीश सिसोदीयांनी केले ट्विट💥


दिल्ली-एनसीआरमध्ये संध्याकाळी ५.५० मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे दिली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले असून काही गॅलरीत येऊन उभे राहिले होते. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदवली गेली.एनआरसीतील भूकंपाचे केंद्र पूर्व दिल्लीत जमिनीखाली ८ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाच्या हादऱ्याने नागरिक घाबरून बाहेर आले. भूकंपाचा एकच धक्का जाणवला, आधीच देशावर कोरोनाचे संकट त्यामध्ये भूकंपाच्या धक्क्याने दिल्लीकर घाबरले आहे. दरम्यान, भूकंपाच्या हादऱ्यानंतर सर्व सुरक्षित आहेत, अशी अपेक्षा करतो व सुर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या