💥ब्लिचिंग पावडरच्या फवारणीने साधे मच्छर सुद्धा मरत नाहीत...!



💥शहरी भागासह ग्रामीण भागातही फवारणी साठी चढाओढ💥


💥फवारणी आणी कोरोनाचा किंवा स्वच्छता आणी कोरोनाचा कोणताही संबंध नाही💥


💥कोरोना हा संसर्ग जन्य रोग,संपर्क टाळण्याचा एकमेव उपाय💥


चारठाणा/कोरोना सारखा महामारी असलेल्या संसर्ग जन्य रोग टाळण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी ग्राउंड लेव्हलला चांगल्या उपाय योजना आखण्याची आवश्यकता असतांना शहराची आणी ग्रामीण भागाची प्रमुख संस्था असलेली महानगर पालिका, नगर पालिका असो कि ग्रामपंचायत येथील कार्य अधिकार असलेले पदाधिकारी चमकोगीताच व्यस्त आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढी बाबत शहरी आणी ग्रामीण भागात खूप टीका झाल्या नंतर शहरासह सर्वत्र ग्रामीण भागात फवारणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली खरी परंतु फवारणीचा आणी कोरोनाचा कुठलाही समंध नाही म्हणजे फवारणी केल्याने कोरोना होत नाही किंवा नाही केलातर होतो असे काहीही नसून गावं, परिसर स्वच्छता, फवारणी आणी कोरोनाचा कोणताही समंध नसल्याचे जाणकारांचे मात असल्याचे चर्चा सत्राहून आणी प्रसिद्ध शास्त्रज्ञ गंगाखेडकर यांच्या सांगण्यातून लक्षात येते. तरी देखील पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून फवारणी साठी सर्वत्र चढाओढ चालु असल्याचे लक्षात येते आहे ती कसण्यासाठी ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही याचा अर्थ नागरिकांची आम्हाला किती काळजी आहे आम्ही तुमची किती काळजी घेतो हे दाखवून देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सर्वत्र चालु आहे. ब्लिचिंग पावडर मुळे साधे मच्छर देखील मरत नाहीत ही वास्तू स्थिती आहे. गेली १०ते११ राज्यात सर्वत्र संचार बंदी आहे एकमेव संसर्ग टाळणे हा त्यावर रामबाण उपाय असून त्यासाठी लोक घराबाहेर पडू नये म्हणून मोठया प्रमाणावर काळजी घेतली जात असतांना विनार्थाच्या फवारणीसाठी नगर सेवक, नगराध्यक्ष, सदस्य, सरपंच,कर्मचारी, अधिकारी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत आणी त्या मुळे मोठया प्रमाणावर संसर्ग होऊन प्रसार होतो आहे या बाबीकडे मात्र डोळेझाक केली जात आहे.दि.२२मार्च  पासून राज्यात संचारबंदी लागू झाली असतांना प्रामुख्याने सत्तेवर असलेले काहीच उपाय योजना करत नसल्याची ओरड शहरा सह ग्रामीण भागात उठल्याने मागील सात आठ दिवसापासून जंतुनाशक हे नाव पुढे करून ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळून फवारणीचा कार्यक्रम सर्वत्र चालु आहे त्या बाबत फोटोशन करून सोशल मीडिया आणी पेपर मधून प्रसिद्धी चालु आहे परंतु सदर ब्लिचिंग पावडर फवारणीने साधे मच्छर सुद्धा मरत माहित फारतर फार ब्याटरेरिया सारखे विषाणू मरू शकतात. मच्छर जरी मारायचे असतील तर निऑन हे रसायन वाफरावे लागते ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन गॅस असतो त्या मुळे त्याचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी, रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी होते त्याचे प्रमाण नळाला पाणी येई पर्यंत कमी होते त्याचा उपयोग फवारणीसाठी होतो आहे.

    आणी या बाबत केवळ प्रसिद्धी साठी उपयोग होत असल्याने मी एक लेख प्रसिद्ध केला होता परंतु हा कुणालाही विरोध किंवा राजकारण नसून खरी परिस्थिती आहे आणी ज्यास्तीत ज्यात जनजागृती करून संसर्ग रोखून कोरोनाला आळा घालणे हा उद्देश आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या