💥नागरिकांनी मास्कचा वापर करून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे💥
मुंबई दि.९- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व जनतेने मास्कचा वापर करावा असे विनंतीवजा आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह राज्यातील ज्या शहरांमध्ये व भागांमध्ये कोरोनाचा प्रभाव आढळून आला आहे, त्या ठिकाणी घराबाहेर पडताना मास्क चा वापर करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या