💥फ्रान्सच्या केपजेमिनी या आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर केली💥
जगभरात कोरोनामुळे उद्योग,व्यवहार ठप्प झाले आहेत. अशातच करोडोमध्ये लोकांच्या नोकऱ्या धोक्यात असताना एका फ्रान्सच्या केपजेमिनी या आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे या कंपनीच्या एकूण २ लाख कर्मचाऱ्यांपैकी १.२ लाख कर्मचारी एकट्या भारतात आहेत. मंदीच्या सावटाखाली या कंपनीने मोठे धाडसी पाऊल उचलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे. तर उर्वरीत कर्मचाऱ्यांना जुलैपासून पगारवाढ मिळणार आहे.
तसेच जे कर्मचारी लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकले आहेत त्यांना १०००० रुपयांपर्यंतचा कॅश अलाऊन्स देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रोजेक्टसाठी वेळेचे बंधनाची आडकाठी करण्यात येणार नसून त्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर आणि न कपात करता करण्यात येणार आहेत. मार्च महिन्याच्या मध्यावधीमध्ये कंपनीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
केपजेमिनी इंडियाचे कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी सांगितले की, हा काळ वाईट आहे. या काळात प्रोजेक्टची वेळ पाळणे महत्वाचे नाही, तर आमचा व्यवसाय कसा विकसित होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आमचे आर्थिक मॉडेल स्पष्ट आहे, यामध्ये बदल करण्याचे काही कारण दिसत नाही. कंपनीचे ९५ टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. एप्रिलमध्ये बढती प्रस्तावित असलेल्यांना १ जुलैपासून पदभार मिळेल. याची जूनमध्ये घोषणा होईल. त्या कर्मचाऱ्यांना मार्चपासून फरकाची रक्कम देण्यात येत आहे.
कंपनीच्या ८४ हजार कर्मचारी जे ए आणि बी ग्रेडमध्ये आहेत त्यांना त्यांची पगारवाढ नियोजनानुसार मिळणार आहे. पगार कपातीबाबत केपजेमिनी इंडियामध्ये चर्चा झालेली नाही, असे त्यांनी पगार कपातीच्या प्रश्नावर सांगितले. कर्मचाऱ्यांचा विश्वासही तितकाच महत्वाचा आहे असेही यार्डी यांनी सांगितले...
0 टिप्पण्या