💥 गोपाल पाटील राऊत यांचेकडुन पञकारांना सुरक्षा किटचे वाटप...!



💥पत्रकारांच्या मदतीला धावलेल्या राऊत यांचे सर्वच स्तरातून होत आहे कौतुक 💥

वाशिम(फुलचंद भगत)-लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मालेगाव शहरातील पत्रकार बांधवांना कोरोणा या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य सदृढ राहण्यासाठी गोपाल पाटील राऊत यांच्या वतीने छोटुशी भेट म्हणून 1 सेनीटायझर 1 ऑंटी सेप्टीक सोलुशन 3 हॅन्ड ग्लोज 3 मास्क 1 डेटॉल साबण असे पाकीट तयार करून देण्यात आले. समाज सेवेचा एक छोटुसा खारीचा वाटा म्हणून भार उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे भोयर यांनी सांगीतले.कोरोणाच्या संकटात गोरगरीब मजूर कामगार शेतकरी पोलीस देवा देणारे डॉक्टर सफाई कामगारांना सरकारकडून मदत मिळावी याकरिता झटणारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकार स्वतः मात्र मदतीपासून वंचित असतो
 प्रत्येक कोरोणा बातमीचे अपडेट मिळवण्यासाठी जिवावर उदार होऊन बातमी करणारा पत्रकार सर्वांनाच हवा असतो प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना आपली प्रसिद्धी करायला पत्रकार हवा असतो?
 मात्र या पत्रकारांना संकटकाळी मदत करण्याला कोणीच पुढे येत नाही ही बाब कुठेतरी माझ्या मनाशी लागली म्हणून मी एक छोटुसा खारीचा वाटा म्हणून आपल्याला एक किट भेट देण्याचा प्रयत्न करत आहोत असे गोपाल पाटील राऊत यांनी सांगीतले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या