💥'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे' यांना शिवचरित्रकार 'यशवंत गोसावी' यांचे अनावृत्त पत्र...!



💥तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्राला आधार देत आहात ,त्याला तोडच नाही💥

आदरणीय उद्धवजी,

यशवंत गोसावीचा आपणास नमस्कार🙏

उध्दवजी, महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचा सिंहाचा वाटा आहे, यशवंतरावांपासून तर विलासरावां पर्यंत आणि वसंतदादां पासून तर बॅरिस्टर अंतुलेंपर्यंत प्रत्येकाचे मोठे योगदान आहे ....!

 पण आजच्या सारखी भयानक परिस्थिती जी तुमच्या वाट्याला आली, ती कोणाच्याही वाट्याला आली नव्हती आणि या परिस्थितीला तुम्ही व आरोग्यमंत्री राजेशजी टोपे ज्या ताकदीने तोंड देताय,ते प्रत्येक मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे..

'तुमची भाषणे व त्यातले शब्द' ऐकून मी देखील तुमच्यावर व्याख्यानांतुन-सोशल मीडियातून अनेकदा टीका केलीय, पण आता लक्षात आली की ती माझी 'चूक' होती, जी पुन्हा कधीच घडणार नाही..
 कारण माणसाची 'खरी पारख' ही संकटाच्या काळात होते आणि कोरोनारुपी संकटाच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्राला आधार देत आहात ,त्याला तोडच नाही..

कोरोना आलाय तसा तो जाईल सुद्धा, पण तुम्ही निभावत असणारे 'पालकत्व' पुढच्या प्रत्येक संकटात 'कर्तृत्वाचा मापदंड' ठरेल...लातूरला भूकंप झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारसाहेबांनी कित्येक दिवस तिथेच तळ ठोकून परिस्थिती पूर्ववत केली आणि त्यानंतर जेव्हा गुजरातला भूकंप झाला,त्यावेळी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयींनी लातूरच काम आठवत पक्षीय मतभेद बाजूला ठेवले व पवारसाहेबांना 'गुजरातची जबाबदारी' दिली.

संकटाच्या काळात 'पक्ष' नव्हे तर 'देश' महत्त्वाचा असतो हा आपला इतिहास आहे.. आणि 'मी प्रत्येक गोष्टीत राजकारण करणार नाही' असे म्हणत तुम्ही तोच वारसा पुढे नेत आहात..

तुमच्या नेतृत्वात लवकरच आपण कोरोनामुक्त होऊ आणि 'बाळासाहेबांच्या मुलाने करून दाखवले' हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडात असेल याचा आम्हाला विश्वास आहे..

साहेब फक्त एकच विनंती आहे 'शस्रांचा व्यापार करणारी 'अमेरिका' अन पर्यटनावर चालणारे 'इटली' यांसारखे देश आज आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत ,पण शेतीवर अवलंबून असणारी आपली माती आजही तग धरून आहे, त्यामुळे इथून पुढच्या काळात 'शेती आणि शेतकऱ्यांवर' आपण जास्तीचे लक्ष द्यावे हीच अपेक्षा🙏

जय हिंद जय महाराष्ट्र...!
आपलाच
शिवचरित्रकार यशवंत गोसावी
मो. 84 46 46 84 46

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या