💥परभणी जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने ३० एप्रिल पर्यंत राहाणार बंद...!



💥कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता सुधारित आदेश काढण्यात आले💥 

परभणी, दि. 13 :-कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात दि.०१ एप्रिल २०२० ते दि.१४ एप्रिल २०२० या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीची दुकाने (अनुज्ञप्त्या) बंद ठेवण्याचे आदेशित केले होते परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता सुधारित आदेश काढण्यात आले असून त्याचा कालावधी ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे.
          मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये जिल्हाधिकारी दि.म.मुगळीकर यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन परभणी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या दुकाने सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, सीएल,एफएल,टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या