💥समितीचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी म्हास्थवीर यांच्या मागदर्शनाखाली वाटप💥
पूर्णा:कांही दिवसा पासून संचारबंदी लागल्याने पराज्यातील निराश्रित पूर्णा येथे अडकले असल्याने पूर्णा प्रशासनाने त्यांना माध्यमिक शाळा पूर्णा येथे निवारा दिला आहे,हे अत्यंत गरीब लोक असून त्यांचे कडे जगण्याचे कोणतेही साधने नाहीत,या सर्व लोकांना आज बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ उपगुप्त जी म्हास्थवीर यांच्या मागदर्शनाखाली जीवन आवश्यक
वस्तूंचे वाटप करण्यात आले
,या प्रसंगी आप्तग्रस्ताना गव्हाचे पीठ,तांदूळ,डाळी, तेल,साखर,पत्ती, साबण,तेल,सरपण,आणि भाजीपाला,चटई, झाडू,आदी वस्तूंचे वाटप पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमै, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे,ऍड हर्षवर्धन गायकवाड,श्रीकांत हिवाळे,विजय बगा टे, डॉ संदीप जोंधळे,विजय जोंधळे ,वाघमारे गुरुजी आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले,
याप्रसंगी या कोरोनटाईल लोकांना
सर्वतोपरी मदत करण्याची तयारी
बुद्ध विहार समितीच्या वतीने करण्याच्या भावना भदंत उपगुप्तजी महास्थविर यांनी व्यक्त
केल्या,या निराश्रित लोकांना ताप, खोकला,अंगदुखी आदी आजाराच्या लोकांना औषधोपचार, आणि त्यांच्या तपासासाठी डॉक्टरची व्यवस्थाही
बुद्ध विहारात करण्यांत आले आहे,असेही त्यांनी आवाहन केले,
जितके दिवस हे लोक येथे असतील तेव्हडे दिवस त्यांना जीवन आवश्यक वस्तूचा त्यांना
पुरवठा केला जाईल,असा दिलासाही त्यांनी दिला,व लोकांनी
घराबाहेर कामाशिवाय पडू नये,प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद द्यावा,असे
अवाहन केले...
0 टिप्पण्या