💥कोरोना व्हायरसला भारताविरुद्ध हत्यार म्हणून वापर करण्याची तयारी ? पाकव्याप्त काश्मीर मधे रचला जातोय कट💥
चीनच्या वुहान शहरातून अवघ्या जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांसमोर संकट उभं केलं आहे. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतदेखील कोरोनाशी लढा देत आहे. देशात ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
एकीकडे देश कोरोना व्हायरसचा मुकाबला करत आहे तर दुसरीकडे काश्मीर घोऱ्यात दहशतवादी आणि सैन्यात चकमकी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच कुपवाडा परिसरात झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले तर ५ दहशतवादांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. अशातच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कोरोना व्हायरसला भारताविरुद्ध हत्यार म्हणून वापर करण्याची तयारी करत आहेत. हे मोठं षडयंत्र पाकव्याप्क काश्मीरमध्ये रचलं जात आहे.
या षडयंत्रात पाकिस्तानी सैन्याचे काही अधिकारीही सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. मागील आठवडण्यात काश्मीर घोऱ्यात भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाकिस्तानी सैन्यात कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यातील ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोना उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
हे हॉस्पिटल लाईन ऑफ कंट्रोलनजीक आहे कारण याठिकाणी लीक होणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवलं जाईल. कोरोना संक्रमित होणाऱ्या पाकिस्तानी सैन्याची संख्या ८०० च्या वर आहे यातील बहुतांश सैनिक एलओसी तैनात आहेत. याच ठिकाणी दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या माध्यमातून दहशतवाद्यांना कोरोनाची लागण होण्याची माहिती भारतीय सैन्याला चिंतेत टाकणारी आहे. मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैन्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या दहशतवाद्यांना क्वारंटाईन किंवा रुग्णालयात न पाठवता आयएसआय भारतीय सीमेत घुसखोरी करण्यास सांगितलं जात आहे.
या दहशतवाद्यांना सांगितलं जात आहे की तुमचा जीव वाचवणं कठीण आहे त्यामुळे तुम्ही दहशतवादी कारवाया करुन मरा. यामुळे काश्मीरमध्ये कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवडण्यात दक्षिण काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर लोकांना दहशतवाद्यांना जेवण-पाणी देऊ नये असं आवाहन मेजर जनरल ए सेन गुप्ता यांनी केलं आहे. कारण हे दहशतवादी कोरोना संक्रमित असू शकतात असं त्यांनी सांगितले...
0 टिप्पण्या