💥पूर्णा येथील भिम व बुध्द जयंती मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी....!


💥मंडळाचे अध्यक्ष अमृतराव मोरे यांचे हस्ते म.फुल्यांच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले💥

येथील सार्वजनिक भिम व बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची 193 वी जयंती प्रातिनिधिक  स्वरूपात साजरी करण्यात आली,या प्रसंगी महात्मा फुले यांच्या तैलचित्रास रिपाई नेते प्रकाश कांबळे, व भिम व बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष अमृतराव मोरे यांचे हस्ते म.फुल्यांच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . या प्रसंगी जयंती मंडळाचे पदाधिकारू वामनराव काळे,शिवाजी थोरात,रामभाऊ कांबळे, श्रीकांत हिवाळे,लिंबाजी खारे,सुखदेव सोनवणे,वाघमरे गुरुजी,राम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते, या हा कार्यक्रम अत्यंत कौटुंबिक स्वरूपात घेण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे सरचिटणीस श्रीकांत हिवाळे यांनी अत्यंत थोडक्यात म.फुल्यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत आज राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाने लॉक डाउन,व संचारबंदीत कोणीही सार्वजनिक स्वरूपात कार्यक्रम घेऊ नयेत,व प्रशासनाच्या अ वाहनाला प्रतिसाद द्यावा,अशी आग्रही भूमिका विशद करून विनम्र  विनंती केली.कार्यक्रमाचे संचलन  वाघमारे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुखदेव सोनवणे यांनी केले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या