💥राज्यातील मृतांचा आकडा अपेक्षेपेक्षा जास्त,राजेश टोपेंच्या माहितीने धाकधूक वाढली...!



💥मृतांचा आकडा 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं💥

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे (Corona Patient death ratio in Maharashtra). राज्यात मृतांची संख्या आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आम्ही 2.5 ते 3 टक्के मृतांचा आकडा अपेक्षित करत होतो. मात्र, मृतांचा आकडा 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. या आकडेवारीने महाराष्ट्रातील नागरिकांची धाकधूक काही प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्वतः राजेश टोपे यांनी महाराष्ट्र कोरोनावर नक्कीच विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तसेच राज्यातील मृतांचीही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत मोठी आहे. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, “राज्यात मृतांची संख्या आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आम्ही 2.5 ते 3 टक्के मृतांचा आकडा अपेक्षित करत होतो. मात्र, मृतांचा आकडा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याबाबत आज बैठक घेवून डॉक्टरांची हाय पावर समिती गठित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का, याबाबत ही समिती अभ्यास करेल.”

राजेश टोपे म्हणाले, राज्य सरकार आता पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE), व्हेंटिलेटर आणि एन 95 मास्क खरेदी करु शकणार नाही. केंद्र सरकार स्वतः संबंधित सर्व साहित्य खरेदी करुन राज्यंना पुरवणार आहे, असं केंद्राने राज्याला कळवलं आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केंद्राकडे 2 हजार 125 व्हेंटिलेटर, 8 लाख 41 हजार एन 95 मास्क, 3 लाख 14 हजार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची मागणी केली आहे.
मृतांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या को-मॉर्बिडीटी म्हणजे पूर्वीचा आजार हे प्रमुख कारण समोर आलं आहे. मुंबईतील जेजे, केईएम यांसारख्या रुग्णालयातील लोकांच्या मदतीने सरकारला सल्ला देण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मृतांचा आकडा कमी कसा करता येऊ शकेल याबाबत सरकारला सल्ला देईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या