💥परभणी जिल्हयात येणे - जाणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेशास बंदी....!



 💥जिल्हा प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.असे आदेश जिल्हादंडाधिकारी मुगळीकर यांनी जारी केले💥

परभणी दि.23:-  नौकरीच्या निमित्ताने जिल्हयातून बाहेर जिल्हयात किंवा बाहेर जिल्हयातून परभणी  जिल्हयात येणे -जाणे करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना  जिल्हयातून बाहेर जाण्यास व जिल्हयात प्रवेश करण्यास  रविवार दि. 3 मे 2020 पर्यंत लागू असलेल्या लॉकडाउन कालावधीत जिल्हा प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
          कोरोना (कोव्हीड -19) या विषाणूचा संसर्ग, प्रादुर्भाव आजूबाजूच्या जिल्हयात झाला आहे . त्यामूळे खबरदारी म्हणून परभणी जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर जिल्हयातून परभणी जिल्हयात येणे - जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हयाबाहेरुन जे अधिकारी - कर्मचारी जिल्हयात ये - जा ( अपडाउन ) करतात, असे अधिकारी- कर्मचारी अनेक व्यक्ती , नागरीक , प्रवासी यांच्या संपर्कात येवून परजिल्हयातून कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रादुर्भाव या जिल्हयात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
             आदेशाचे पालन न करता अनाधिकृतपणे जिल्हयात ये - जा केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल . सदरील आदेशाची अमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सर्व कार्यालय, विभाग प्रमुखावर राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                         -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या