💥चीनचा कपटपणा; इटलीने मदत म्हणून दिलेली किटस् त्यांनाच विकली...!💥व्हायरसच्या उत्पत्तीचे मूळ ठिकाण असलेला चीन मात्र या संकटाचा फायदा उचलताना दिसत आहे💥

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना या व्हायरसच्या उत्पत्तीचे मूळ ठिकाण असलेला चीन मात्र या संकटाचा फायदा उचलताना दिसत आहे. या काळात इतरांना मदत करणे तर सोडाच पण चीन खाल्ल्या मिठालाही जागताना दिसत नाही. चीनच्या याच कृतघ्नपणाचे एक उदाहरण समोर आले आहे. वुहानमध्ये कोरोना थैमान घालत असताना इटलीने चीनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी PPE किटस् फुकटात देऊ केली होती. मात्र, आता कोरोनामुळे इटली संकटात सापडला आहे. अशावेळी चीन इटलीनेच दिलेली किटस् त्यांना पैसे घेऊन विकत आहे. चीनच्या या कृतघ्नपणाविषयी अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

स्पेक्टॅटर नियतकालिकाच्या माहितीनुसार, चीनने काही दिवसांपूर्वी इटलीला  PPE किटस् दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, चीनने इटलीला ही किटस् मोफत नव्हे तर पैसे देऊन विकली आहेत. ट्रम्प प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात स्पेक्टॅटर नियतकालिकाला माहिती दिली. चीनने इटलीला त्यांचीच PPE किटस् विकत घ्यायला भाग पाडल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या