💥चुडावा पोलीसांना चकमा देऊन पळणारी गुटख्याने भरलेली इनोव्हा पुर्णा पोलीसांच्या तावडीत तस्कर मात्र फरार ?💥
पूर्णा/तालुक्यात लॉक-डाऊन संचारबंदी काळातही सर्वत्र पोलीसांची नाकाबंदी असतांना मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले असून चुडावा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वसमत फाट्यावर पोलीसांची नाकाबंदी असतांनाही निर्ढावलेल्या अवैध गुटखा तस्कराने नाकाबंदी उधळून अवैध गुटख्याने भरलेली इनोव्हा कार चुडावा पोलीस स्थानकाची हद्द पार करून पूर्णेकडे आणल्याची हिंमत केली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.चुडावा पोलिसांनी सदरील अवैध गुटख्याने भरलेली इनोव्हा कार नरहापूर फाट्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला असता संबंधित कार चालकाने पोलीसांना चकमा देऊन पूर्णेकडे पळवली या घटनेची माहिती कार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसांनी पुर्णा पोलीसांना दिली पूर्णा पोलिसांनी तात्काळ धनगर टाकळी फाट्यावर सापळा रचला व कार ताब्यात घेतली परंतु कारचा चालक कार सोडून पसार झाल्याचे पुर्णा पोलीसां कडून समजते यावेळी कारची तपासणी केली असता कार मध्ये प्रतिबंधीत अवैध विषारी गुटखा पुड्यांचा साठा ज्यात माणिकचंद गुटखा,गोवा गुखा,हिरा गुटखा पुड्यांसह सिगारेट असा अंदाजे ४,०००००/-(चार लाख रुपयांच्या) मुद्देमाल आढळून आला पुर्णा पोलीस प्रशासनाने ४ लाख रुपयांच्या अवैध गुटखा साठ्यासह इनोव्हा कार ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली असली तरीही अवैध गुटखा तस्करासह कार चालक हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
सदरील घटनेची माहिती परभणी जिल्हा अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकारी येऊन चुडावा पोलीस ठाण्यात फिर्याद रितसर फिर्याद देतील या नंतरच गुन्हा दाखल होईल.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता राज्यासह परभणी जिल्ह्यातही शासनाने लॉक-डाऊन घोषित करुन संचारबंदी सह सर्वत्र नाकाबंदी केली आहे परंतु कडेकोट संचारबंदी व नाकाबंदी काळात सुध्दा अवैध गुटखा तस्कर अवैध रेती माफियांच्या कारवाया थांबल्याचे दिसत नाही पोलीस सातत्याने गस्त घालत असतानाही अवैध प्रतिबंधीत गुटका,राजरोसपणे होणारी चोरट्या रेतीची तस्करी अवैध देशी-विदेशी दारू तस्करी आदी अवैध व्यवसाय चोरट्या मार्गांचा वापर करून सातत्याने चालतांना दिसत आहे.
आज सोमवार दि.१३ एप्रिल रोजी पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी बबीलवार चुडावा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वसमत फाट्यावर नाकाबंदीचे कर्तव्य बाजावत असतांना त्यांना एम.एच.-२६ -एच-१४११ करड्या रंगाची इनोव्हा कार कट मारून सुसाट वेगाने निघाली.सदरील वेगाने जाणाऱ्या कार संदर्भात पो.कॉ.बबीलवार यांना शंका आली व त्यांनी आपल्या मोबाईल वरून चुडावा पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून घटनेची त्यांना माहिती दिली असता या मार्गावरील नऱ्हापूर फाट्यावर उपनिरीक्षक चव्हाण व पो.कॉ.टाक यांनी सदर कारला पकडण्यासाठी जाऊन थांबले परंतु त्यांनाही सदरील कार चालकाने चकमा देत सुसाट वेगाने पूर्णेकडे पळ काढला यावेळी चव्हाण यांनी पूर्णा पोलीस स्थानकाचे सहा.पो.नि प्रवीण धुमाळ यांना खबर देताच पो.कॉ.समीर पठाण,पो.कॉ.गिरीश चन्नावार,वाघ यांना घेऊन धुमाळ यांनी धनगर टाकळी फाट्यावर नाकाबंदी करून सापळा रचला. सदरील इनोव्हा कार चालकाने पुढे पोलीस उभे असताना पाहून गाडी सोडून पोळ काढल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते सदरील कारची तपासणी केली असता ज्यामध्ये प्रतिबंधित विषारी गुटखा आरएम डी(माणिकचंद गुटका) आठ खोके, हिरा ७०७ मिक्स मोठे पोते, सिगारेट बॉक्स असा अंदाजे चार लाखांचा माल व एक इनोव्हा कार जप्त करून चुडावा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चव्हाण यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरील गुटक्या बाबत जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी येऊन रीतसर फिर्याद दिल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती चुडावा पोलीस ठाण्याचे पो.उपनिरीक्षक चव्हाण यांनी दिली....
0 टिप्पण्या