💥त्वचा विशेषज्ञांनी या लक्षणाला ‘Covid Toes’ (कोविड टोज) असं नाव दिलं आहे💥
युरोप आणि अमेरिकेतील त्वचा विशेषज्ञ सध्या करोनाच्या रुग्णांची ओळख पटवण्यासंबंधी दिसत असलेल्या एका नव्या लक्षणाबद्दल चर्चा करत आहेत. खासकरुन हे लक्षण लहान मुलं आणि तरुणांमध्ये दिसत आहे. मार्च महिन्यात इटलीमधील काही त्वचा विशेषज्ञांना करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज येत असून जळजळ होत असल्याचं लक्षात आलं होतं.
त्वचा विशेषज्ञांनी या लक्षणाला ‘Covid Toes’ (कोविड टोज) असं नाव दिलं आहे. इटलीमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या ठिकाणी ही समस्या सर्वात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आता मात्र ही समस्या फक्त इटलीपुरती मर्यादित राहिलेली नसून अमिरेकेतही अशी लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं आहे. खासकरुन सर्वात जास्त बाधित झालेल्य बोस्टनमध्ये अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मटोलॉजीशी संबंधित डॉक्टर ‘कोविड टोज’ची समस्या घेऊन य़ेणाऱ्या लहान मुलांची करोना चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. इटलीमध्ये या मुलांमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. यामुळे त्वचा विशेषज्ञ आणि मेडिकल प्रोफेशनल यांच्यात यावरुन अनेक वाद-विवादही रंगले होते. करोना महामारी होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. जागतिक आरोग्य संघटना कोरोनाशी लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांचा शोध घेणं हे सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं आहे. यामुळे कोरोनाग्रस्त देशांना पुन्हा एकदा मृत्यू झालेल्यांची माहिती मिळवण्यास भाग पाडलं आहे...
0 टिप्पण्या