💥आयसोलेशन व क्वारंटाईन रुग्णांची व्यक्तीशः केली विचारपुस केली💥
💥जिल्हा रुग्णालय परभणी येथे ३२० संशयितांची नोंद जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नाही💥
परभणी दि.12:- परभणीचे जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी आज पाथरी व मानवत येथील ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देवुन संपूर्ण पाहणी केली तसेच आयसोलेशन व क्वारंटाईन रुग्णांची व्यक्तीशः विचारपुस करून संबंधित अधिकाऱ्याकडून औषधी साठा व कोरोनाविषयक लागणारे साहित्य, उपकरणे , मनुष्यबळ या बाबत सविस्तर आढावा घेवुन भविष्यात घ्यावयाच्या खबरदारीबाबत योग्य त्या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांच्या निर्देशानुसार तबलिक जमात दिल्ली प्रकरणातील संशयितांचे पहिले स्वॅब निगेटीव्ह येऊन ७ दिवस पुर्ण झाले आहेत अशा व्यक्तींचे दुसरा स्वॅब पुर्नतपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते त्या पुर्नतपासणीत स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
आज रोजी जिल्हा रुग्णालय परभणी येथे ३२० संशयितांची नोंद झाली असून एकुण घेण्यात आलेले नमुने २८४ व त्या पैकी २४४ निगेटिव्ह असुन २३ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत . आजपर्यंत १७ स्वॅब पुणे राष्ट्रीय विषाणु संस्था व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय , औरगाबाद यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे .
आज दि. १२ एप्रिल २०२० रोजी एकुण १८ संशयितांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय , औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे . आज नव्याने दाखल झालेले संशयीत १४ असून एकुण नोंद झालेले संशयीत ३२० पैकी विलगीकरण केलेले १३०, हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्षात २०, विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेले १७०, नोंद झालेल्या एकुण ३२० पैकी परदेशातुन आलेले ६२ व त्यांच्या सपंर्कातील ६ असे आहेत. तसेच जिल्हयात कोव्हिड १९ विषाणु बाधीत आज रोजी एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-
0 टिप्पण्या