💥पुण्यात दुधाच्या कॅनमधुन हातभट्टी दारुची विक्री...!💥अन् दुधाच्या 'कॅन' मध्ये चक्क सापडली 'हातभट्टी' दारू; पुण्यातली अजब घटना💥

पुणे : लॉकडाऊनमुळे जीवनाश्यक वस्तू सोडून सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. त्यामुळे नियमित दारु पिणार्‍यांची चांगली पंचाईत झाली आहे. सरकारी दारु बंद झाल्याने सध्या बेकायदेशीर हातभट्टीला चांगलाच डिमांड आला आहे. संपूर्ण बंद व रस्त्यां रस्त्यांवर नाकाबंदी असतानाही शहरात हातभट्टीचा सुकाळ कसा झाला, याचे कोडे अनेकांना पडले होते. कोथरुड पोलिसांच्या नाकाबंदीत हे कोडे सुटले. मोटारसायकलला दुधाचे कॅन लावून बावधन कडून येणार्‍या दोघांना त्यांनी तपासणी केली तर त्याच्याकडील दुधाच्या कॅनमध्ये चक्क हातभट्टीची दारु आढळून आली.
मनोहर मारुती कळवनकर (वय ४३, रा. केळेवाडी, कोथरुड) आणि संतोष सुरेश यादव (वय ३६, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील दुधाच्या कॅनमधील ८ लिटर दारु व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
शहरात लागू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यासाठी चांदणी चौकाजवळ नाकाबंदी करण्यात आली आहे. बुधवारी तेथे सहायक पोलीस निरीक्षक बाबर व इतर नाकाबंदी करीत होते.  पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार दत्ता शिंदे, विलास जोरी, विलास ढोले, विजय कांबळे, मनोज पवार, युवराज काळे, अभिजित वालगुडे हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मनोज पवार व विजय कांबळे यांना दोघे जण दुधाच्या कॅनमधून दारु घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे चांदणी चौकाजवळील जैन लोहिया आयटी पार्क येथे नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. तेव्हा कळवणकर व यादव मोटारसायकलला दुधाचा कॅन लावून येत होते. त्यांना थांबवून तपासणी केल्यावर दुधाच्या कॅनमध्ये हातभट्टीची दारु होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या