💥परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधीत अद्याप पर्यंत एकही रुग्न नाही..!💥जिल्हा प्रशासनाचा कोरोना व्हायरस विरोधात यशस्वी लढा,कोरोना रुग्न दगावल्याचे वृत्त खोडसाळ पणाचे💥

परभणी/जिह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री.दिपक मुगळीकर यांच्या कोरोना व्हायरस विरोधातील लढ्याला सध्यातरी यश आल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना विषाणू बाधीत रुग्न आढळला नाही परंतु नांदेड जिल्ह्यातील एका दैनिकाच्या पोर्टलवर दि.१२ एप्रिल २०२० रोजी सावधान; परभणी येथील मृत्यू झालेला तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..असे जनसामांन्यात भ्रम निर्माण करणारे व खोडसाळपणाचे वृत्त सोशल मिडियावर प्रकाशित झाल्यानंतर जनसामांन्यामध्ये दहशतीचे वातावरण तर निर्माण झालेच या शिवाय आपल्या जिवाची यत्किंचितही पर्वा नकरता कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नयें याकरिता अत्यंत चौकसपणे कठोर लढा देणाऱ्या जिल्हा प्रशासनाला बदणाम करण्याचा कट रचण्यात येत असल्याचे वृत्तातून निदर्शनास आले जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष कार्यतत्पर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी या खोडसाळ व जनसामान्यांत भ्रम निर्माण करणाऱ्या निराधार वृत्ता संदर्भात तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून आजच तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश ही दिल्याचे समजते.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण अद्याप दगावलेला नाही किंबहुना कोरोना विषाणू व्हायरसचा एकही रुग्ण जिल्ह्यातील कोणत्याही भागात कोणत्याही रुग्णालयात आढळलेला नाही तरी देखील अत्यंत खोडसाळपणे भ्रम निर्माण करणारे खोटे वृत्त काही समाज विरोधी तत्व प्रकाशित करीत असून सोशल मिडियावर ही अफवा पसरवून कर्तव्यात कुठलीच कसर न ठेवता अहोरात्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू न देणाऱ्या जिल्हा प्रशासनाची बदनामी करीत असल्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना केली आहे.

एवढेच नव्हे तर अफवा पसरवणाऱ्या आणि जिल्हा प्रशासनाची बदनामी करणाऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी जारी केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत..

परभणी जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संदर्भात योग्य ती काळजी आणि योग्य त्या दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतल्या आहेत सर्वप्रथम संपूर्ण राज्यात परभणी जिल्ह्याच्या सीमा बंद करून यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केला त्यानंतर परभणीच्या शासकीय रुग्णालयात अनेकांची तपासणी करण्यात आली एवढेच नव्हे तर संशयित व्यक्तींचाही तपासण्या करण्यात आल्या

मात्र काही समाजकंटकांनी विविध माध्यमांचा द्वारे अफवा पसरविण्यात आल्या आहेत या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये आजपर्यंत एकही रुग्ण दगावला नाही किंवा एकाही रुग्णाला बाधा झाली नाही असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले आहे

यासंदर्भात अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात आणि संस्थेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या