💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील सोमेश्वर महादेव संस्थान देवस्थानची अंमली बारसेला होणारी यात्रा रद्द...!💥कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त मंडळाने घेतला निर्णय💥 

पूर्णा/तालुक्यातील गौर व आहेरवाडी येथील कामदा एकादशी पासून सुरु होणाऱ्या आमल्या बारशीनिमित्ताने भरणारी भव्य दिव्य यात्रा,पालखी सोहळा,भव्य कुस्त्यांची दंगल या वर्षी कोरोना ससंर्गामुळे तहसिलदार पल्लवी टेमकर व गावातील विस्वस्त मंडळाने दिलेल्या माहीतीवरुन रद्द करण्यात आल्या आहेत .
     
 तालुक्यातील गौर येथे श्री सोमेश्वर महाराजांचे भव्य दिव्य हेमाडपंथी मंदिर व बारव आहे .श्री सोमेश्वर महाराज हे जागृत देवस्थान आहे  नवसाला पावते दर वर्षी यात्रेत प्रत्येक घरुन आयंबील , लिंबाचा पाला , दवना, हरभरा दाळ , गुळ  व एक भगवी पताका घेवून वाजत गाजत कोणी घंटा , गायीची गोरे  किवा कालवड , गुप्तदान अशा विविध प्रकारे आपाअपले नवस फेडतात , गावातुन बाहेर कामानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिक दर्शनासाठी येतात , पालखी , संगीत भजणे , कीर्तन , नाटक , कुस्ती असे (ता . ०४ ते ०८ )चार दिवस  चालणाऱ्या  यात्रेचा हनुमान जयंतीने समारोप होत असतो ती यात्रा रद्द करण्यात आली आहे .
         आहेरवाडी येथे (ता ०५ ते ०६ )रोजी सजगीर हिरागीर महाराज यांच्या पालखी सोहळा व भव्य कुस्त्यांची दंगल व जिल्ह्यात प्रसिद्ध असनारी वांग्याची भाजी व भाकरी जिथे पन्नास हजार भक्त दर्शनासाठी येतात व प्रसाद म्हणून सर्वजण भोजन करुन जातात परंतु यावर्षी कोरोना संसर्ग होवु नये म्हणून  शासनाच्या आदेशानुसार संचारबंदी , १४४ कलम व लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर कोणीही पडुनये म्हणून गौर येथील पंचकमिटी रामराव पारवे , सोपानराव जोगदंड , शिवाजी पारवे ,उध्दव जोगदंड व आहेरवाडी येथील देवस्थानच्या मंडळाने घेतलेल्या लेखी ठरावानुसार व तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी दिलेल्या सुचनेनुसार यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या