💥पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर शिवारातील गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड...!💥लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या दारु दुकानांमुळे मद्यपींचा कल आता गावठी दारू व बनावटी विषारी ताडीकडे💥

पूर्णा/लॉकडाऊन मुळे संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात देशी-विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे दारुमुळे तळमळणाऱ्या तळीरामांच्या झुंडी आता गावठी दारुसह विषारी केमिकल पासून तयार करण्यात येत असलेल्या बनावटी ताडीकडे वळतांना दिसत असून असाच एक गावठी दारुचा अड्डा तालुक्यातील कात्नेश्वर शिवारात चालत असल्याची खबर गुप्त खबऱ्याकडून मिळताच पुर्णा पोलीसांनी गावठीदारुच्या अड्डयावर धाड टाकून गावठी दारु बनवण्याचे १ हजार लीटर केमीकल व २५ लीटर बनवलेली गावठी दारु,एक दुचाकी वाहन,दोन ड्रम,गुळ,नवसागर,आदीं साहीत्य जप्त केले आहे.
तालुक्यातील कात्नेश्वर-आहेरवाडी रोडवर कात्नेश्वर शिवारात एका शेतात अवैधरित्या विनापरवाना गुळ,नवसागर,पाणी,केमीकल वापरुन गावठी दारु बनवण्याचा उद्योग सुरू होता.याची माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळतात पुर्णा पोलिस स्थानकाचे सपोनि.प्रविण धुमाळ व रमाकांत नागरगोजे जमादार जरार खान सिद्धीकी,पोहेकाॅ.किशोर कवठेकर,पोहेकॉ.हनमंत टाक,शिवरत्न शिंदे,सय्यद कलंदर,अक्षय वाघ,कात्नेश्वर पोलिस पाटील ज्ञानोबा काटकर,यांचे पथक कात्नेश्वर शिवारात दाखल झाले. येथील आहेरवाडी रस्त्यालगत शेतात आज रविवार दि.०५ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास धाड टाकली.पोलीस दारु अड्डयाकडे येत असल्याचे पहाताच तेथून शेतमालक आरोपी कैलास जाधव याने पळ काढला.घटनास्थळांवर पोलीसांनी अर्धवट तयार असलेली १ हजार लिटर दारु नष्ट केली.तर तेथून २५ लीटर तयार गावठी दारु,एक दुचाकी वाहन,दोन टाक्या,गुळ,नवसागर, बाटल्या आदीं गावढी दारु बनवण्याचे साहीत्य जप्त केले आहे.
       याप्रकरणी दारुबंदी अधिनियमानुसार.पुर्णा पोलीस स्थानकात आरोपी कैलास जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यातील मद्य विक्रीची दुकाने दि.२३ मार्च २०२० पासून २१ दिवस लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर बंद असल्यामुळे तालुक्यातील तळीरामांची तळमळ त्यांना मृत्यूकडे ओढत असल्याचे निदर्शनास येत असून बऱ्याच कालावधी नंतर पुन्हा तळीरामांची तळमळ पाहाता बेकायदेशीर पणे दारू विक्री करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांनी
संधीचा फायदा घेत पुन्हा एकदा आपला मोर्चा गावठी दारू निर्मितीसह विषारी केमिकलचा वापर करीत बनावटी ताडी निर्मितीकडे वळवल्याचे दिसत आहे.मानवी शरीरास अत्यंत घातक ठरणाऱ्या गावठी दारू व बनावटी ताडी मुळे एखादी भयंकर घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असून पुर्णा शहरात अवैध बनावटी दारुसह केमिकल युक्त ताडीची मोठ्या प्रमाणात विक्री होतांना दिसत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या