💥वाशिम जिल्ह्यातील गरीबांची जि.प.अध्यक्ष चंद्रकात ठाकरे यांना आर्त हाक...!
💥नेहमी सामाजीक कार्यात अग्रेसर राहणार्‍या ठाकरे कुटुंबाकडुन लोकांच्या अपेक्षा💥

वाशिम(फुलचंद भगत)-नेहमी सामाजिक कार्यात मंगरुळपीर येथील ठाकरे कुटुंबिय अग्रेसर राहुन लोकांना केद्रस्थानी ठेवुन कार्य करीत असतात,विविध ऊपक्रमाच्या माध्यमातुन सामाजिक योगदानही खरच वाखानन्याजोगे असते.सध्या कोरोनाने सर्वञ हाहाकार माजवल्याने प्रशासनाला सर्वञ संचारबंदी नाईलाजाने लावायचे काम पडल्याने या संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असुन हातावरचे पोट असलेल्या गरीब मजुर लोकांची तर आबाळ होत असुन ऊपासमारीचीही वेळ आली आहे.अशातच आपल्या हक्काच्या,लोकप्रीय आणी युवा नेतृत्व म्हणून नावलौकीक असलेल्या आपल्या लाडक्या नेत्याची आठवण या कठीण समयी गोरगरीबांना झाल्यावाचुन कशी राहणार बरे म्हणूनच "दादा,गरज आहे तुमची सध्या गरीबांना अशी आर्त हाक आपल्या नेत्याला म्हणजेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकात ठाकरे यांना लोक मारत आहेत.या हाकेला नक्कीच दादा ओ सुध्दा देतील अशी अपेक्षाही लोक व्यक्त करीत असुन आपला लाडका नेता आपल्याला असे वार्‍यावर नाही सोडणार असा विश्वासही व्यक्त होतांना दिसत आहे.प्रशासन आपल्या परिने आटोकाट प्रयत्न करुन गरजुंना मदत करन्यासाठी करत आहे आणी सेवाभावी लोकांनाही मदतीचे आवाहन करत आहे.या परिस्थितित आपल्या हक्काच्या माणसाकडुन खुप अपेक्षा असतात तशाच अपेक्षा मंगरुळपीर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील जनता जि.प.अध्यक्ष चंद्रकात ठाकरे यांचेकडुन करीत असुन आपले लाडके नेते आपले जरुर अश्रु पुसतील यात तिळमाञ शंका नाही असे गरीब गरजु बोलत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या