💥" रोगापेक्षा औषध भयंकर " न झाल्यास भारताला कोरोनावर मात करणे शक्य..!
💥लेखक - प्रकाश कांबळे,
मो.9423759667

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जगातील अनेक देश
परस्पराविरुद्ध लढले,त्यात मोठा रक्तपात झाला .लाखो लोक मारले गेले.हे युद्ध सत्ता,साम्राज्य आणि प्रतिष्ठेसाठी असल्याचे दाखले इतिहासात सापडतात.पण आता जे महायुद्ध सुरू झालेले आहे,त्यात कोणत्याही देशातील सैन्याचा रक्तपात होतांना दिसत नाही.या 
युद्धात परस्परांविरुद्ध युद्ध करणारे देशही दिसत नाहीत.परंतु
या युद्धातही मनुष्य हानी होतेय.
माणसं मरताहेत ,त्याना प्रत्यक्ष कुणी मारीत नाही,ती स्वतःच विषारी विषाणूच्या प्रभावाने बाधित झाल्यामुळे मरताहेत.हे 
तिसरे महायुद्ध "विषारी विषाणू कोरोना"विरुद्ध संपूर्ण विश्व असे
आहे.                                      
      या विषारी विषाणूचा प्रादुर्भाव प्रथमतः चीन मधे झाला.चीनच्या सुप्रसिद्ध डॉ.ली.वेनलियांग यांनी डिसेंबर2019मधेच्या विषारी 
विषाणूच्या दुष्परिणामांची व त्यावरील उपायांची चीन सरकारला कल्पना दिली होती.परन्तु त्याकडे दुर्लक्ष केले 
गेले.डॉ.ली वेनलियांग हे चीन मधील सुप्रसिद्ध डॉक्टर परंतु
त्यांनी कोरोनाच्या संबंधी सांगितलेला सल्ला नजरंदाज केला गेला ,मुद्दाम की अनावधानाने हे सांगणे कठीण.
त्याची माहिती जगापुढेही आली 
नाही.पण पुढे या कोरोना विषाणूने प्रथमतः चीनवरच आपला प्रभाव दाखविला.या विषाणू ने चीन मधील हजारो लोकांना बाधित केले.बाधित झालेल्या हजारो लोकांना आपले
प्राण गमवावे लागले.चीन मधे
हा हा कार माजवून हा विषानू ज्या -ज्या देशात पोहोनचला तिथेही या विषाणू ने आपली 
कर्तबगारी दाखविली.या विषारी 
विषाणूच्या प्रादुर्भावाने इटालीत
मृत्यू चे खच पडले.इटाली हादरले.इटालिच काय जगात महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही दीड लाखावर लोक या विषाणूच्या प्रभावाने बाधित झाले.हजारो
लोक मृत्यु पावले.जर्मनी,इराण,
न्यूयार्क, फ्रान्स,स्पेन,अशा जगातील कितीतरी बलाढ्य देशात या विषाणूंनी शिरकाव करून धुमाकूळ घातला. हजारो
लोकांचे बळी घेतले.आणिआठ
लाखापेक्षा जास्त लोकांना या विषाणूने प्रभावित केले आहे.असे
असतांना चीन मात्र आज पूर्वपदावर येतांना दिसतो.तेथील
 परिस्थिती झपाट्याने सुधारतं आहे.तेथील व्यवहार सुरळीत 
होतांना दिसतात. चीन मधील आर्थिक शहर म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या 'शांघाय' आणि 'बिचिंग'
सारख्या गर्दीच्या शहरात ह्या विषाणू चा प्रादुर्भाव दिसला नाही.
हे मात्र विशेष,आणि नवलाचे!
     जगातील प्रमुख देशातील आर्थिक स्थिति डबघाईला आली,शेअर्सच्या किंमती निम्या 
झाल्या,शेअर बाजार कोसळले.
मात्र चीन च्या आर्थिक परिस्थिती वर याचा कोणताही परिणाम झाला नाही.हा चीन चा आर्थिक डाव आहे कि काय?अशी शंका 
निर्माण होण्यास वाव आहे.
    साधारणतः जाने.2020 नवीन
वर्षात कोरोना चा रुग्ण भारतात सापडला.परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही.22 मार्च2020 ला देशात लॉक डाउन 
करून घंटा वाजविणेची घोषणा प्रधान मंत्री मोदींनी देशाला केली .तोपर्यंत या विषाणू ने बाधित झालेले बरेच परदेशातील
लोक भारतात आले होते.त्यांच्या 
सहवासात आलेल्या आणि त्यांनी
स्पर्श केलेल्या वस्तू आणि जागेवरून हे विषाणू ,परदेशातून
आलेल्या श्रीमंत पाहुण्यासह जिथे 
गेले,तिथे-तिथे लोक बाधित झाले.या विषाणूंचा प्रादुर्भाव रोकण्याचा उपाय म्हणून प्रधान मंत्र्यांनी देशात लॉक डाउन ला प्रारंभ केला.मोदींना हे उशिरा का होईना सुचलेले शहाणपण देशातील लोकांसाठी हिताचे ठरले.इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना बधितांची,व त्यामळे मृत्यु गेलेल्यांची संख्या
बरीच अल्प आहे.हा लॉक डाउन
परदेशातील श्रीमंत पाह्यन्यांना देशात प्रवेश करण्यापूर्वीच केला असता तर अनेकांना आपले जीवही गमवावे लागले नसते.पाहुण्यांच्या लागणीनेच देशात ही परिसस्थिती निर्माण झाली ना? परदेशातून आलेल्या 
पाहुण्यांना प्रारंभीच विमान तळावर या विषाणूच्या संबंधाने 
तापसण्या करून ते निर्जंतुक असल्याची खातरजमा केली असती तर हा प्रसंग देशावर आलाच नसता.असे वाटते.
       लॉक डाउन हा उपाय आहे,ते या रोगाचे औषध नाही. कोरोना ला रोखण्याचे हे प्रयत्न
परंतु कोरोनाला ऐकता येत नाही,तो निर्जिव विषाणू आहे
असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे
तरीही,देशाचे प्रधान मंत्री मोदी
टाळ्या वाजविण्याची,आणि घंटानाद करण्याची देशाला 
अतार्किक,अवैज्ञानिक, आणि 
आतांत्रिक सूचना करतात .
या घंटा नादाने व टाळ्या वाजविल्याने काय साध्य झाले 
हे तेच जाणोत त्यांच्या "मन की
बात" मधे याचे उत्तर सापडले 
नाही. अगोदरच देशात अतार्किक,अंधश्रद्धा, अंध भक्ती
अंधविश्वास या व अशा असंख्य
रोगांतुन देशाचे बहुतांश नागरिक 
मुक्त झाले नाहीत.त्यात मोदींनी घंटानादाची भर टाकली.त्यांच्या 
मनात नेमके या विषयी काय चालू
आहे?हे समजणे अनाकलनीय 
आहे.याची माहिती फक्त त्यांच्या
कम्पू तील लोकांनाच असावी.
      कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव 
देशभर पसरू नये म्हणून प्रधान मंत्र्यांनी उशिरा का होईना लॉक डाउन चा निर्णय घेतला.व त्याची
आंमलबजावणी देशभर होतांना
दिसते.ही बाब चांगली म्हणावी.
परंतु हे लॉक डाउन 15 एप्रिल 
पर्यंत असल्या चे  त्यांनी जाहीर केले, यात मात्र राजकारणाचा वास येतो.हे त्यांचे सुडाचे राजकारण आहे की काय?अशी
दाट शंका येते.हे लॉक डाउन 13
एप्रिल पर्यंत केले असते तर कांही
आकाश कोसळले नसते.15 एप्रिल पर्यंतच्या लॉक डाउन मागचे गूढ ही त्यांनी स्पष्टपणे 
सांगितले नाही.त्यामुळे त्यांच्या
मनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे
हे स्पष्ट होते.कारण 14 एप्रिल हा
या देशाचे घटनाकार,महामानव,भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 
जन्मदिन .या दिनीभारतातील
 कोट्यवधी आंबेडकर अनुयायी 
हा दिवस मोठ्या आनंदाने,उत्साहात साजरा करतात. हा आनंदाचा दिवस देशातील त्यांच्या कोट्यवधी अनुयायांनी साजरा करू नये,ही
तर मोदींच्या मन की बात नाही ना?कारण हे लॉक डाउन 15 एप्रिलच्या ऐवजी मे,जून महिन्याच्या कोणत्याही तारखे पर्यंत जाहीर केले असते तर ही शंका घेण्यास वाव मिळाला नसता, 15 एप्रिल पर्यंतच्या लॉक डाउन च्या घोषणे मुळे शंकांचे वादळ उठणे चूक ठरू नये.या शिवाय 22 एप्रिल चा घंटानाद हे देवाकडे घातलेले साकडे तर नव्हते ना?
      जागतिक आरोग्य संघटनेचे महा संचालक टेडरोज आधानोम 
गेब्रिएसस यांनी तर अगोदरच स्पष्ट केले की लॉक डाउन हे कांही कोरोना वर औषध नाही,तो
फक्त त्यावर एक उपाय आहे.चीन ने या कोरोना चा प्रादुर्भाव देशात वाढू नये म्हणून  लॉक डाउन चा उपाय चीन मधे अंमलात आणला.पण सोबतच चीन ने केवळ 10 दिवसात 1000 खाटा चे अद्यावत रुग्णालय उभारून
कोरोना शी मुकाबला करण्याची
तयारीही केली.आज चीन ने कोरोना मुळे बिघडत चाललेली 
परिसस्थिती आटोक्यात आणली.चीन मधील जनजीवन आज सुरळीत होतांना दिसते.
  भारतीयांचे काय?देशात ग्रामीण
आणि शहरी भागात सुद्धा कोरोना शी लढण्याला सुविधा कुठे आहेत?देशातील नागरिकांना नाकाला लावायला साधे मास्क सुद्धा नाहीत.मास्क चाही काळाबाजार ,लोकांच्या आरोग्य विषयक चिंता कोण घेणार? रुग्णालयात उपचारासाठी सुविधा
कधी पुरविल्या जातील?या बाबत
कोण वाचा उघडणार?असे एक नव्हे,आरोग्य संबंधिशेकडो प्रश्न उपस्थित आहेत.त्याची पूर्तता होणार का ?हाच खरा प्रश्न आहे.
 कोरोना हा बाधित व्यक्तींच्या 
स्पर्शाने होतो,तो संसर्गजन्य आहे,हे सिद्ध झाले आहे. हा कोरोना श्रीमंत पाहुण्यांनी भारतात आणला,तो आज गरीब-गरजुच्या जीवनात येऊन त्यांचे जगणे कठीण करीत आहे.श्रीमंत 
पाहुणे(कोरोना ग्रस्त वगळता)मौजमजा करण्यात मश्गुल आहेत .पण मजुरीवर पोट
जगणाऱ्या लोकांना लॉक डाउन 
च्या संचार बंदी मधे ढुंगणावर पोलिसांच्या काठ्या खाव्या लागत 
आहेत,नाहक बिचारे पिसले जात
आहेत.कोरोनाला परदेशातून भारतात आणणारे पाहुणे,आणि 
त्याना कोणत्याही कोरोनाच्या 
तपासनिशिवाय देशात वावर करण्यास प्रतिबंध न करणारे दोषी नाहीत काय? त्यांचा शोध 
कोण घेणार?श्रीमंतांची मजा गरिबांच्या पथ्यावर?त्यांना ती जगू ही देत नाही आणि मरूही
देत नाही.या परिस्थितीला जबाबदार कोण?
   लॉक डाउन च्या प्रभावाने लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. देश दहशतीखाली वावरतो आहे.यातून बाहेर पडण्याचा दिलासा देण्यासाठी कांही बोटावर
मोजण्या इतके नेते,लोक प्रतिनिधी अवाहन करतांना दिसतात.देशाचे गृहमंत्री ,अन्य मंत्रीगण, खासदार,आमदार,कुठे
दडले?कळत नाही. केंद्र आणि 
राज्य सरकारने संचारबंदीत पोलिसांना दंडुक्याची कमाल दाखविण्याची मुभा दिली.हे दंडुके
नागरिकांच्या हितासाठी आईच्या
मायेने नागरिकांना सहन करावे
लागत असतील तर काही हरकत नाही., पण ते सूड भावनेने नागरिकांवर बरसर असतील तर मात्र "रोगापेक्षा औषध भयंकर"
म्हणण्याची पाळी येते.
       मराठवाड्यात या करोनाचा 
प्रादुर्भाव नगण्य आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील एक रुग्ण वगळता मराठवाड्याच्या कोणत्याच जिल्ह्यात या रोगाची लागण झाली नाही.हा आरोग्य ग्राफ स्थिर ठेवण्यात प्रशासनाच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञाता व्यक्त 
करायलाच हवी.असे असताना 
मराठवाड्यातच नव्हे,एकूण राज्यात आणि संपूर्ण देशात बळजबरीने काम सोडून घरी
बसवलेल्या रोजनदारीवरील कामगारांना दयेने किंवा सहानुभूती ने खासगी आणी 
सारकरिअन्न धान्य आणि जीवणावश्यक वस्तूंचे वाटप ही
ही त्यांच्यावर मेहरबानी नव्हे,तर तो त्यांचा हक्क ठरतो. भारतीय
संविधानाने भारतातील प्रत्येक
नागरिकांचा तो हक्क असल्याचे
मान्य केले आहे.तो त्यांना न्यायाने
मिळाला पाहिजे.मदतीतून ही भावना दिसायला हवी.
     देशातील सर्व खासदार आणि
विधायक हे देशातील लोकसेवक
आहेत.ते पगारी नोकर नाहीत,तरीही त्यांना दरमहा पगार,भत्ते,आणि विविध प्रकारच्या सवलती मिळतात.शिवाय मतदारसंघात काम करण्यासाठी भरपूर निधी
मिळतो.देश कोरोना विरुद्ध तिसरे
महायुद्ध लढत असतांना अनेक
उद्योगपती,दानशूर लोक कोरोनाच्या विरुद्ध लढण्यास भरीव मदत देत आहेत,देशातील
प्रधान मंत्र्यासह सर्व मंत्रीगण,संसदेचे सर्व सदस्य,राज्यांतील सर्व मुख्यमंत्री, आणि सर्व विधायक यांनी त्यांना मिळणाऱ्या विकास निधीतून प्रत्येकी 2 कोटी रुपये आणि दोन
महिन्याचे वेतन या संकट काळी
"कोरोना रिलीफ फंड"म्हणून देण्याचे निश्चित केले तर या आजाराचे उपाय आणि औषधं आणि आवश्यक उपकरणे उभी करण्यास देशाला,राज्याला मोठी
मदत होऊ शकते.पण त्यात राजकारण होऊ नये, एव्हढेच।

                    प्रकाश कांबळे,
                    पूर्णा, जि परभणी
                    431511         
                    9423759667
                 (भ्रमणध्वनी)

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या