💥पालम तहसिल कार्यालया समोरील मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी पळवला ३७१५४/-रुपयांचा मुद्देमाल..!



💥लॉक-डाऊन व संचारबंदी असतांनाही पोलीसांना आव्हान देत चोरट्यांनी साधला डाव💥

परभणी/जिल्ह्यातील पालम विविध घटनांनी सातत्याने गाजत असल्याचे दिसत असून दि.११ एप्रिल २०२० रोजी पालम येथे जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या विशेष पथकाने पकडलेल्या तब्बल ४,४६,५७०/- रुपयांच्या विदेशी दारू साठ्याची घटना ताजीच असतांना पालम पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी पुन्हा एक घटना उघडकीस आली असून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह पालम तालुक्यातही लॉक-डाऊन व संचारबंदी असतांना पोलीस स्थानकाच्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर व अगदी तहसील कार्यालयासमोर असलेले कन्हैया कम्युनिकेशन मोबाईल शॉपी अँड फर्निचर व एचडीएफसी बँकेची सेवा केंद्र असलेले दुकान ०९ एप्रिल २०२० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दोन मोबाईल सामसंग कंपनीचे अॉनराईड मोबाईल किंमत २७१५४/-रुपयें व दोन सिसीटीव्ही डिव्हीआर वहार्डडीस्क असा एकून ३७१५४ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असून पालम तालुक्यात कायद्याची धार बोधट झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती अवैध व्यवसाय करणारे ज्यात अवैध रेती माफीया,अवैध देशी-विदेशी दारू तस्कर/विक्रेते यांची हिंमत वाढल्याचे निदर्शनास येत आहे.मोबाईल दुकान मालक श्री अशोक गणेशलाल बाहेती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पालम पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 457,380, अन्वये अज्ञात चोरट्यांन विरोध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नामदेव राठोड हे पुढील तपास करत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या