💥5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता फ्रिज,एसी,टीव्ही व इतर विद्युत उपकरणे नेहमीप्रमाणे चालू ठेवावीत...!💥जिल्हादंडाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आवाहन💥

       परभणी दि.4:- 5 एप्रिल 2020 रोजी रात्री 09 . 00 वाजता 9 मिनिटे स्वेच्छेने घरातील सर्व लाईट्स बंद करून आपल्या दरवाजा किंवा बाल्कनीतून मेणबत्ती , दिवा , टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावावा . हे सर्व करीत असतांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडू नये . हे करताना कोणीही रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये . तसेच घरातील इतर उपकरणे जसे की, फ्रीज , एसी , टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे नेहमी प्रमाणे चालू ठेवावीत. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी दि.म.मुगळीकर यांनी केले आहे.

         कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगात आहे . त्यामुळे या विरोधात स्वविलगीकरण , सामाजिक अंतर राखण्याची कृती करुन निर्धारपूर्वक लढण्याचे आवाहन भारताचे  पंतप्रधान यांनी केले आहे . त्यासाठी त्यांनी 5 एप्रिल या दिवसाची निवड केली आहे . कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटापासून दूर जाण्याचे सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत , त्यासाठी लॉकडाऊनची घोषणा देशात व राज्यात करण्यात आली आहे . या काळात परभणी जिल्हयातील जनतेने मोठे सहकार्य केले आहे . परभणी जिल्हयातील जनतेने 22 मार्चला जनता कर्फ्यूचे 100 टक्के पालन केले . त्यानंतर आता येत्या रविवारी अर्थात 5 एप्रिलला रात्री 09 . 00 वाजता परभणी जिल्हयातील जनतेने स्वेच्छेने 9 मिनिटे द्यायची आहेत .
       सदर तारखेस रात्री 09 . 00 वाजता घरातील सर्व लाईट्स स्वेच्छेने बंद करून बाल्कनी किंवा दरवाजासमोर मेणबत्ती , दिवा , टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावावा . तथापी हे करत असतांना रस्त्यावरील पथदीवे , घरातील फ्रीज , एसी , टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे बंद करु नयेत . असेही आवाहन परभणी जिल्हयातील जनतेला करण्यात येत आहे . जनतेने घरातील उपकरणे यांचा वापर चालू ठेवावा व काहीही काळजी करु नये. असेही कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या