💥सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती दुकाने सुधारीत आदेशानुसार 3 मे पर्यंत बंद...!



💥आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिले💥

परभणी, दि. 27 :- जिल्हयात कोरोना (COVID - 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हयातील सर्व किरकोळ, मद्यविक्री अनुज्ञप्ती मद्यविक्रीसाठी दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्णतः बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते परंतु  कोरोना (COVID -19) विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने जिल्हयातील अनुज्ञप्ती दि. 3  मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत सुधारीत आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
            आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये  अधिकाराचा वापर करुन परभणी जिल्हयातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती ( एफएल - 2 , एफएल - 3 , एफएल - 4 , सीएल - 3 , एफएलनिआर - 2 ) अनुज्ञप्ती   दि. 3  मे 2020 पर्यंत मद्यविक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लघंन झाल्यास संबंधिताविरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
               -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या