💥परभणी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे सुधारीत आदेश जारी...!💥सुधारित आदेशानुसार लॉक-डाऊन कालावधी दि.30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे💥

  परभणी दि.31:- जिल्हाधिकारी कार्यालयाने फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे दि . 31 मार्च 2020 पर्यत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. परंतु राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविला असल्याने  जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 22 मार्च 2020 व त्यानंतर वेळोवेळी काढलेल्या आदेशाचा कालावधी  सुधारित आदेशानुसार दि.30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, निर्देश, परीपत्रके या कालावधीत अंमलात राहतील. हे आदेश दि.13 एप्रिल 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी यांच्या सही शिक्यानिशी निर्गमित करण्यात येत असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
                      -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या