💥परभणी जिल्ह्यात संचारबंदी काळात कष्टकरी रोजमजूर भिकारी यांच्यावर उपासमारीची वेळ...!



💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांनी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता💥


परभणी/संपूर्ण जगात माहामारी म्हणून उदयास आलेल्या भयंकर चिनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस,संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याची घोषणा काल मंगळवार दि.२४ मार्च रोजी केली.लोकांनी गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढवण्याचा धोका लक्षात घेऊन २१ दिवस लॉकडाऊन अर्थात संचारबंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला परंतु हातावर पोट असलेल्या रोजंदारी कामगार,फिरस्ती छोटे व्यवसाईक,गोरगरीब भिकारी यांच्या उदरनिर्वाहाचे काय ? प्रश्न निर्माण झाला आहे.

परभणी जिल्ह्यात कामगार,रोजंदारीवाले मजुर,रस्त्यावर भिक मागणारे गोरगरीब फिरस्ती छोटे व्यवसायीक गरजु यांना तर रोज बाहेर जावुन कमवुनच आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागतो अशा हातावरचे पोट असणारे असंख्य लोक तब्बल २१ लॉकडाऊ संचारबंदीत तग कसे धरतील बरं ? कोरोना विषाणूच्या संसर्गा अगोदरच त्यांना उपासमारीतून आपणे प्राण गमवावे लागणार नाही का ? जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हापोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी अशा गोरगरीब,रोजमजूर,रस्त्यावर भिक मागून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्यांच्या  पोटापान्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पावले उचलतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी रेल्वे स्थानकासह पुर्णा रेल्वे स्थानक,सेलू रेल्वे स्थानक,मानवत रेल्वे स्थानक,गंगाखेड रेल्वे स्थानक पाथरी बसस्थानक,सोनपेठ बसस्थानक,पालम बसस्थानक,परिसरात वास्तव्यास असणाऱ्या व रस्त्यावर भिक मागून जिवण जगणाऱ्या गोरगरीब भिकारी तसेच वाड्या वस्त्यामध्ये,झोपडपट्यामध्ये राहणारे गोरगरीब रोजंदारी कामगार या २१ दिवसांच्या संचारबंदी काळात अक्षरशः उपासमारीने आपला जिव सोडून देतील.अश्या गोरगरीब लोकांच्या जवळ नाही पैसा नाही हाताला कुठलेच काम नाही अशा गंभीर परिस्थितीत त्यांना कोणी उधार पैसाही देणार नाही आणी एखादा दुकानदारही दुकाना पुढे उभे राहू देणार नाही मग अश्या गंभीर परिस्थितीत त्यांनी करायचे तरी काय ? प्रशासनानेच आता अशा गरीबांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता निर्माण झाली असून परभणी जिल्हा प्रशासनाने २१ दिवसांच्या संचारबंदी काळात अश्या गोरगरीब रोजमजूरांवर उपासमारीची वेळ येऊ नए या दृष्टीने तात्काळ पावल उचलने आवश्यक असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होतांना दिसत आहे....
       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या