💥वर्दीतील देवदूतांनों कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्तीचा आसूड असायलाच हवा...!



💥परंतु विरोधात का लिहिले म्हणून पत्रकारांना पदाचा गैरपापर करीत मारहाण करुन सुड घेण्याचा प्रकार नसावा💥

'वास्तव-सत्यता'- चौधरी दिनेश (रणजीत सी.)✍
****************
संपूर्ण जगभरात चिनी कोरोना विषाणूंनी हाहाकार माजवल्याचे दिसत असून भारतात ही या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू नये याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.लॉकडाऊन नंतर महाराष्ट्र राज्यातही राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी संपूर्ण  राज्यात कलम १४४ जमावबंदी कायदा व संचारबंदीसह आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ ( Disaster Management Act, 2005 ) कायदा लागू केल्याची घोषणा जगात भयंकर महामारी म्हणून उदयास आलेल्या चिनी कोरोना विषाणूंच्या संसर्गा मूळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर असंख्य लोक मृत्यूच्या दाढेत अडकल्याचे निदर्शनास येत आहेत.या गंभीर परिस्थितीत कोरोना विषाणूंच्या विरोधात संपूर्ण जगासह महाराष्ट्र ही लढा देत आहे.या जिवघेण्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढता कामा नये याकरिता पोलीस प्रशासन आपला व आपल्या कुटुंबाचा जिव धोक्यात घालून जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न हाताळत आपले कर्तव्य बजावतांना पाहावयास मिळत आहेत तर वैद्यकीय अधिकारी,परिचारीका (नर्स) व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असंख्य कर्मचारी अश्याच प्रकारे स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचा जिव धोक्यात घालून मनात कुठल्याही प्रकारची द्वेषभावना न ठेवता 'कोरोना विषाणू बाधीतांना' या भयंकर जिवघेण्या महामारी पासून वाचवण्यासाठी दिवसरात्र त्यांची सेवा करतांना पाहावयास मिळत आहे. तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्यातील महानगर पालीका,नगर परिषद,ग्रामपंचायत आदी शासकीय कार्यालयातील स्वच्छता विभागात काम करणारे असंख्य स्वच्छता रक्षक अर्थात स्वच्छता कर्मचारी स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या जिवाची परवा नकरता शहर गाव पातळीर स्वच्छतेची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडीत जनसामान्यांचे आरोग्य सुरक्षीत राहावे याकरिता कठोर परिश्रम घेतांना पाहावयास मिळत आहे.
जागतिक महामारी ठरलेल्या भयंकर कोरोना व्हायरचा आपल्या व आपल्या कुटुंबालाही धोका होऊ शकतो ही बाब संपूर्णपणे माहित असतांना जनसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी सातत्याने आपली लेखणी झिजवणारा व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे जनहीतवादी वृत्तांकन करीत जनसामान्यांना वेळोवेळी सतर्क करणारा पत्रकार व त्याच्या कुटुंबाची काय अवस्था आहे याचे मात्र कोणाला तरी भान आहे का ? नैसर्गिक आपत्ती असो की कुठली दंगल असो की आणखी कुठली छोटी-मोठी घटना ना पगाराची आवश्यकता ना मानधनाची चिंता तात्काळ जनसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून लेखणी झिजवणाऱ्या या 'बिन पगारी फुल अधिकारी अन् पदरात मात्र द्वेष आणी प्रत्येकाकडून मिळणाऱ्या अपमानाची शिदोरी' अशी अवस्था आजच्या या कोरोना विषाणूंच्या संकट काळातही झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
जनसामान्यांसाठी सातत्याने प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन कलम झिजवणारा वृत्तपत्र प्रतिनिधी असो की इलेक्ट्रॉनिक्स मिडिया-सोशल मिडियावर सत्य वृत्तांकन करणारा पत्रकार भ्रष्ट राजकारणी-भ्रष्ट अधिकारी-माफिया अवैध व्यवसायीक-पोलीस प्रशासन प्रत्येकाच्या नजरेत खटकत असतो व स्वतःच्या पदरात मात्र फक्त द्वेष पाडून घेत असतो जमावबंदी असो की संचारबंदी असो की आपत्ती व्यवस्थापण कायदा पत्रकार तर बिन पगारी फुल अधिकारी बनून प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून जनसामान्यांच्या जागृतीसाठी आपले कर्तव्य बजावणारच मग मागील काळात जनतेच्या हितासाठी त्याने ज्याच्याही विरोधात लिखाण केले त्या सर्वांचीच त्याच्यावर वक्रदृष्ठी होणारच ना ? असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडला अत्यंत इमानदार कर्तव्यदक्ष व कर्तृत्ववान म्हणून ख्यातीप्राप्त असलेले आयपीएस अधिकारी तथा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.योगेश कुमारजी यांचे नाव जरी सहज कोणी घेतले की आमच्या मनात आदर निर्माण होतो कारण या इमानदार कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाचे आम्ही पुर्णेकर पत्रकार प्रत्यक्ष साक्षिदार आहोत अश्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात पोलीस प्रशासनात कार्यरत स.पो.नि.ओंकार चिंचोलकर नामक एका सुडाने पेटलेल्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करीत लोकमतचे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना गांधी चौक हिंगोली येथे गोरगरीबांना मारहाण का करताय असे विचारताच तुला लई मस्ती आली आमच्या विरोधात लई बातम्या लावल्या असे म्हणून कानावर शासकीय रिवाल्वर लावून जबर मारहाण करीत राज्यात सद्या आपत्ती व्यवस्थापण कायदा लागू आहे कायदा आमच्या हातात आहे तुला मारुन टाकले तरी आमचे काही वाकडे होणार नाही असे म्हणून जिवे गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली अशी कोरोना विषाणू वृत्तीचा मानसिकता जनहीतवादी पोलीस प्रशासनाला कलंकीत करणारी नव्हें का ? आज संपूर्ण जगात कोरोना विषाणू व्हायरस या जागतिक महामारी मुळे परिस्थिती भयंकर अवघड झाली असतांना या परिस्थितीत सुड उगवने कितपत योग्य ? हिंगोली-नांदेड-परभणी या तिनही जिल्ह्यांमध्ये कार्यरत जिल्हा पोलीस अधिक्षक अत्यंत कर्तव्यकठोर आणी कर्तव्यदक्ष असल्याने या तिन्ही जिल्ह्यात परिस्थिती सद्यातरी आटोक्यात आहे असे म्हणने चुकीची ठरणार नाही परंतु या परिस्थितीत पोलीस प्रशासनासह जनसामान्यांना स्वतःच्या जिवावर उध्दार होऊन खंबीरपणे साथ देणारा जर कोणी असेल तर तो पत्रकारच ना ? मग त्या पत्रकाराने तुमच्या हातून काही कळत/नकळत काही चुक झाली किंवा शहर गाव पातळी काही अनैतिक व्यवसाय चालत असतील तर तुम्हाला सतर्क करणे हा त्या पत्रकाराचा गुन्हा आहे काय ? आज आम्हाला नव्हे तर आमच्या जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक तथा आयपीएस अधिकारी श्री.कृष्णकांतजी उपाध्याय यांच्यावर अभिमान आहे कारण त्यांचे कर्तृत्वच तसे आहे लॉकडाऊन काळात पुर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संत्र्याचा ट्रक पुर्णा पोलीस स्थानकातील काही कर्मचाऱ्यांनी अडवून ठेवला सदरील बाब संबंधित शेतकऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानावर टाकली यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक उपाध्याय यांना कळवली त्यानंतर क्षणाचाही विलंब नकरता त्यांनी श्री उपाध्याय यांनी शेतकऱ्याचा संत्र्याचा ट्रक तर सोडायला लावलाच याशिवाय संबंधित शेतकऱ्याची आस्थेवाईकपणे विचारपूस करून कर्मचाऱ्यांच्या चुकी बद्दल दिलगिरी ही व्यक्त केली अश्या मोठ्या मनाचा आणी सुसंस्कारी अधिकारी या जिल्ह्याला लाभलाय हे या जिल्ह्याचे भाग्यच म्हणावे लागेल परंतू जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात कार्यरत अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांनाही सन्माननीय जिल्हा पोलीस अधिक्षक उपाध्याय यांनी असे निर्देश द्यायला हवे की कोणीही अश्या या गंभीर परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा किंवा पदाचा गैरवापर करीत सुडभावनेचा वापर करून कोणत्याही पत्रकाराला मारहाण किंवा अपमानीत करण्याचा प्रकार करू नयें कारण पत्रकार हा एकच असा व्यक्ती असतो जो वेळोवेळी प्रत्येकाच्या कार्यक्षम/अकार्यक्षमतेसह बऱ्या-वाईट गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत असतो...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या