💥जिल्ह्यातील दारुबंदी विभागाचे दुर्लक्ष,मद्यशौकीनांची प्रचंड आर्थिक लूट💥
पूर्णा/कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन संचारबंदी लागू केली संचारबंदी दरम्यान जिवनावश्य व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत परंतु शासनाचे बंदी आदेश डावलून शहरात मोठ्या प्रमाणात तिप्पट दामात दारुची विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापणा कायद्याची मद्यपी सर्रास पायमल्ली करतांना पाहावयास मिळत असून अवैध दारु माफीया तालुक्यात सर्वत्र नंगानाच करतांना पाहावयास मिळत आहेत.
तालुक्यासह शहरात अवैध दारु विक्रेते ५० रुपये अधिकृत किंमत असलेली देशी दारू क्वॉटर २०० रुपयाल तर १४० रुपये किंमतीची विदेशी दारूची बॉटल चक्क ५०० रुपयास विक्री केली जात आहे.शहरात भर संचारबंदीतही अवैध दारु माफीयांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत असून पूर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात बनावट मद्याची ४ पट दराने खुलेआम होणारी विक्री मद्य शौकीनांच्या आरोग्याचा घात करतांना दिसत आहे शहरातील विविध भागात गल्लीबोळात अवैध दारु विक्रेत्यांकडून संचारबंदीतही घरपोच सेवा पुरवणारी यंत्रणा तयार झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील दारूबंदी विभाग मात्र अल्प कर्मचारी संख्ये अभावी हतबल आहे की लक्ष्मीअस्त्रा मुळे असा प्रश्न जनसामांन्यात उपस्थित होत आहे.
एकीकडे सर्व देश कोरोनासारख्या जीवघेण्या रोगविरुद्ध निकराचा लढा देत असताना पूर्णा परिसरात मात्र काही अवैध दारू माफीया या गंभीर परिस्तिथीला कॅश कसे करता येईल ह्यासाठी तन-मन-धन लाऊन प्रयत्न करत आहेत.
भर संचारबंदीत पूर्णेत मद्याचा महापूर येतोच कसा ? दररोज सर्व दारू दुकाने बंद असताना एवढ्या मोठया प्रमाणात आणि घरपोच मद्यसाठा बिनबोभाट पोहोचतो कसा ? असे असंख्य प्रश्न जनतेतून उपस्तीत केले जात आहेत बरं गल्लीबोळातल्या दारुमाफियांनी तर यावरही कडी करत चक्क ४५० ते ५०० रुपये क्वॉटरचा भाव फिक्स केला आहे आणी हा सर्व प्रकार शेवटी गल्लीबोळातून जगजाहिरपणे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? या सर्व गोष्टींकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ह्या जीवघेण्या दारुषमाफियांचा उच्छादाला प्रतिबंध घालणे जरुरी असल्याचे सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे.संबधित यंत्रणा सदर गोष्टीचा गंभीरपणे विचार करून कडक कार्यवाही करणार असेल तरच ही कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आता जनतेतून व्यक्त होत आहे...
0 टिप्पण्या