💥कोरोना विषाणूंचा फैलाव तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन धोकादायक..!



💥तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन,सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होऊ शकतो कोरोना नागरिकांनी काळजी घ्यावी - डॉ. संतोष मुंडे


 परभणी/कोरोना विषाणुमुळे जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा पसार रोखण्यासाठी तंबाखू व तंबाखजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धूम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून धुम्रपान करणे धोकादायक ठरू शकते. प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे, नागरिकांना स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
       संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या व्हायरसने भारतातही आपले पाय पसरले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील पान टपऱ्या , तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले असून याची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे. पुढील निर्णय होईपर्यंत तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थची विक्री करणारी सर्व दुकाने , पानटपऱ्या बंद राहणार असून या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पथकाची नेमणुकही करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तंबाखू व तंबाखजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धूम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारे दुकाने पुढील आदेशपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद , पोलीस , तहसीलदार , पंचायत समिती , नगर परिषद स्तरावरील अधिकाऱ्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे असे आदेशात उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे. तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून तंबाखू व तंबाखजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धूम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे या बाबी सर्व टाळाव्यात व काळजी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील पान टपऱ्या , तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले असून याची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे. परभणीला ही असे आदेश काढले पाहिजे का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या