💥डॉक्टर व परिचारिक यांचे कर्तव्य कौतुकास्पद- भक्तराम फड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. संपूर्ण जग हादरले असतांना अशा परिस्थितीतही डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मात्र आपले कर्तव्य प्रामाणिक पणे करीत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे परिचारिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भक्तराम फड यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जगभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
कोरोना विषाणुमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत यापूर्वीच आदेश काढण्यात आले आहेत. याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, शहरालगतच्या जवळपास असलेल्या अशा मोठ्या शैक्षणिक संस्था देखील 31 मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत सुचित करण्यात आले. ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था ह्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच शाळा बंद, ऑफिसेस बंद, मॉल्स रिकामे पडले आहेत, ठरवलेले कार्यक्रम रद्द होताहेत, विमान कंपन्या उड्डाण रद्द करतायेत, अर्थव्यवस्था जमिनीवर आलेली आहे, सेन्सेक्स कधी नव्हे इतका कोसळलेला आहे, एवढेच नव्हे तर देशोदेशींच्या सीमा सुद्धा आता बंद होत आहेत.
हस्तांदोलन तर दूर, लोक एकमेकांकडे बघायला सुद्धा घाबरत आहेत. दवाखाने मात्र अजूनही उघडे आहेत. डॉक्टरस् व परिचारिका अजूनही पेशंटची तपासणी उघड्या हातांनी करीत आहेत. सर्दी खोकला आणि तापाचे रूग्ण बघितल्यानंतर रुग्णा जवळ जाऊन त्याची तपासणी करून इंजेक्शन सलाईन ड्रेसिंग व इतर उपचार करीत आहेत. धंद्याच्या काळात म्हणजे मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत ज्याप्रमाणे हॉटेल आणि वाहनांचे दर वाढलेले असतात त्याप्रमाणे कुठल्याही डॉक्टरने करोना व्हायरसच्या साथीच्या काळात देखील दर वाढवलेले नाहीत. डॉक्टर्स व परिचारिका ही एकमेव जमात आहे जिला करोना व्हायरसचा जास्तीत जास्त धोका असूनही ते त्यांच्या कामापासून एकही पाऊल मागे हटलेले नाहीत. हे अभिमानाने सांगावेसे वाटते. स्वतःच्या कामावरची निष्ठा आणि माणुसकीची जाण असणाऱ्या सर्व डॉक्टर्सनां व परिचारिका कर्मचारी ना सलाम अशा शब्दांत रूग्ण करीत आहेत. नैसर्गिक आपत्ती ही मोठ्या प्रमाणात डॉक्टर व पारिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. याचा अभिमान असल्याचे मत परिचारिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भक्तराम फड, विकास डोईफोडे, सिध्देश्वर मुसळे .प्रतिम साखरे, नाना चाटे ,सुरज गालफाडे.वैभव घुगे यांनी मांडले....
0 टिप्पण्या