💥परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली💥
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.
वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, " पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नववी आणि अकरावीच्या परिक्षेचा निर्णय 15 एप्रिलनंतर होईल आणि दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार आहे. याशिवाय, दहावी वगळता इतर सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी 'कोरोनाच्या विरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे....
0 टिप्पण्या