💥परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध इमारतीचे अधिगृहण...!



💥जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या आदेशाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध इमारतींचे अधिगृहन💥 

परभणी/संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दहशतीखाली वावरत असून राज्य सरकार कोरोना विषाणू संसर्ग रोकण्यासाठी उपाययोजना करीत असून  कोरोना विषाणू ( COVID - 19 ) च्या संसर्गामुळे परभणी जिल्हयात आपत्तीजनक परिस्थिती उदभवू नये, यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील विविध इमारती अधिगृहीत करण्यात आल्या असून जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समन्वयाने या ठिकाणी Quarantine Places स्थापन करावेत. असे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म.मुगळीकर यांनी दिले आहेत
कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक व पूर्वतयारी योजना आखणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये संशयित कोरोना विषाणूंचा ( COVID - 19 ) संसर्ग झालेल्या व्यक्तींना विलग करुन Quarantine Places आणि कोरोना विषाणूंचा ( COVID - 19 ) संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळून आल्यास त्याकरीता Isolation Ward स्थापन करणे आवश्यक असल्याने जिल्हयातील विविध इमारती आरोग्य विभागाच्या अधिनस्त Qurantine Places स्थापन करण्यासाठी पुढील आदेशापर्यत अधिगृहीत करण्यात आलेल्या आहेत.       
Qurantine Places आणि Isolation Ward स्थापन करण्यासाठी परभणी येथील कस्तुरबा गांधी बालीका विदयालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वस्तीगृह,जिंतूर येथील अल्पसंख्याक महिला वस्तीगृह व कस्तुरबा गांधी बालीका विदयालय आणि शासकीय तंत्रनिकेतन,सेलू येथील अल्पसंख्यांक शासकीय वस्तीगृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह, गंगाखेड येथील अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वस्तीगृह ,पालम तालुक्यातील केरवाडी येथील  स्वप्नभूमी विज्ञान भवन, पूर्णा येथील मागासवर्गीय मुलांची निवासी वस्तीगृह व कस्तुरबा गांधी बालीका विदयालय , सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालय, पाथरी येथील अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वस्तीगृह व कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय , मानवत येथील समाज कल्याण विभागाचे मुलांचे  व मुलींचे वस्तीगृह आदी ठिकाणच्या इमारती अधिगृहीत करण्यात आलेल्या  आहेत. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या