💥औरंगाबादला कोरोना नंतर नवीन ‘सारी’ आजाराचे दोन रुग्ण वाढले.....!💥सारीमुळे मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तसेच इतर चार रुग्णही आढळून आले💥

कोरोना व्हायरस सोबतच शहरात सारी (सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पायरेटरी इलनेस) या नवीन आजाराचादेखील प्रादुर्भाव झाला आहे. सारीमुळे मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तसेच इतर चार रुग्णही आढळून आले होते. त्यानंतर बुधवारी सारीचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

एकीकडे कोरोना रोखण्यासाठी तयारी सुरू असताना आता सारी या आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत. मंगळवारीच सारीमुळे शहरात एकाचा मृत्यू झाला. तसेच इतर चार रुग्णही आढळून आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी सारीचे आणखी दोन रुग्ण आढळून आले. आता शहरातील सारीच्या रुग्णांची संख्या सात झाली आहे.
या आजाराची लक्षणे सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनासारखीच असून दोन दिवसातच रुग्णांची तब्येत चिंताजनक होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या