💥कलम ३६० देतं आर्थिक आणीबाणीचे अधिकार, पंतप्रधान मोदी घेणार का निर्णय..?💥आज मोदी काय घोषणा करणार याकडे सर्व देशाचे लक्ष्य लागून राहिलेलं आहे.💥

देशामधील करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच देशातील जनतेशी संवाद साधला होता. आज मोदी काय घोषणा करणार याकडे सर्व देशाचे लक्ष्य लागून राहिलेलं आहे. मोदी काय बोलणार यासंदर्भात अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता मोदी देशामध्ये आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा करु शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायलयातील वकील आणि स्पंद या सेवाभावी संस्थेचे संस्थापक तसेच लेखक असणाऱ्या प्रशांत पटेल उमराव यांनी देशामध्ये आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

💥 आणीबाणी म्हणजे काय ?

देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत या मूलभूत अधिकारांवर अधिक कठोर मर्यादा आणल्या जातात. घटनात्मक तरतुदींचा वापर करून कायद्याचा वापर करून या मुलभूत अधिकारांवर काही ठराविक काळासाठी मर्यादा घातल्या जातात त्याला आणीबाणी असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० हे आणीबाणीशी संबंधित आहे. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे. पहिली राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी राष्ट्रपती राजवट...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या