💥महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने होत आहे वाढ..!💥अजीत न्युज हेडलाउन्स - महत्वाच्या सुपर - ६ न्युज💥

💥घाबरून जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा  - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई पाच तर ठाण्यात १ रुग्ण  आढळल्याने ११६ वरुन ही संख्या १२२ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तीन तासात ६ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे. सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली. त्यानंतर सहा नवे रुग्ण आढळले आहेत ज्यामुळे ही संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे.
तरीही घाबरून जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.


************************************

💥ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण; राजघराण्यापर्यंत पोहचला संसर्ग💥


प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आता शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशात आता राजघराण्यातही या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. इंग्लंडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढली. ज्यामुळे लोकांच्या भेटीगाठी घेताना हस्तांदोलन करु नका असं राजघराण्यातून सांगण्यात आलं होतं. आता प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. ट्विटरवर तर #Prince Charles हा ट्रेंडही झाला आहे. यामध्ये अवघ्या काही वेळातच ७० हजाराहून अधिकांनी ट्विट पहिले आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रिन्स चार्ल्स यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना केली आहे. तर अनेकांनी डायना यांच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल असं म्हणत या बातमीची खिल्लीही उडवली आहे.

************************************

 💥लॉकडाउनमध्ये घरबसल्या बँकेतून मागवा पैसे💥


कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. या हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुमच्या जवळील रोकड संपण्याची शक्यता आहे. अशामध्ये कोणत्या कामासाठी तुम्हाला पैशांची चणचण भासत असल्यास घाबरून जाऊ नका. या परिस्थितीमध्ये तुम्ही घरबसल्या बँकेकडून पैसे मागवू शकता. एसबीआय, आयसीआयसीआय, एक्सिस आणि कोटक सारख्या मोठ्या बँकांनी ग्राहकांसाठी ही सुविधा उपलबद्ध केली आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, घरी पैसे मागवायचे असल्यास तुम्हाला बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर Bank@homeservice लॉगइन करावं लागेल. त्याशिवाय बँकेच्या ग्राहक सेवांवर क्रमांकावर (कस्टमरकेअर) फोनही करू शकता. बँकेकडून रोकड मागण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच ही सेवा उपलब्ध असणार आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये बँकेचे प्रतिनिधी तुम्हाला पैसे पोहच करतील. दोन हजार रूपयांपासून दोन लाख रूपयांपर्यंत तुम्ही पैशांची मागणी करू शकता. या प्रक्रियेसाठी तुम्हाला एकरकमी शुल्क ५० रूपये आणि १८ टक्क्यांचं सेवा शुल्क असं ६० रूपये भरावे लागतील.
तब्बल ४० कोटीं ग्राहक असणारी एसबीआय डोरस्टेप डिलव्हरी या सुविधेच्या अंतर्गत घरपोच पैसे आणि घरीच पैसे जमा करण्याची सुविधा देतेय. एसबीआयची ही सुविधा फक्त ज्येष्ट नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांसाठी आहे. या सुविधेचं शुल्क १०० रुपये आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक एचडीएफसीही ग्राहकांना घरपोच पैशांची सेवा देतेय. पाच हजार रूपयांपासून २५ हजारांपर्यतची नगद ग्राहक घरपोच मागवू शकते. त्यासाठी १०० रूपयांपासून २०० रुपयांपर्यतच शुल्क संबंधित बँकेकडून आकारलं जाते. कोटक, एक्सिस आणि इतर बँकमार्फतही अशाच नियमांनुसार घरपोच पैशांची सेवा दिली जाते. संबधित बँकेचं संकेतस्थळ किंवा अॅपवर या सुविधेची सर्व माहिती उपलबद्ध आहे.
जर तुमच्या बँक खात्यावर पुरेसे पैसे नाहीत आणि तुम्हाला गरज असल्यास घाबरण्याचं कारण नाही. बँकेकडून तुम्हाला तात्काळ कर्जाची सुविधाही मिळतेय. सध्याच्या परिस्थितीमध्ये काहींच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक चणचण जाणवत असल्यास या सुविधेचा लाभ घेता येईल. मनीटॅपचे कुणाल वर्मा यांच्यानुसार, बँकेच्या अॅपमध्ये केवायसी पुर्ण करून अवघ्या १२ ते २४ तासांत कर्ज घेता येतं. कर्जाची रकम तुमच्या बँक खात्यात सरळ जमा होते. तुम्ही ती रक्कम घरबसल्या बँकेकडून मागवू शकता.

*************************************

💥केंद्र सरकार ८० कोटी लोकांना गहू २ रुपये तर तांदूळ ३ रुपये किलो दराने देणार💥


केंद्र सरकार ८० कोटी लोकांना २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलोने देणार तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं. अवघ्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउनचा निर्णय मान्य केला. आज पत्रकार परिषदेतही सोशल डिस्टसिंग पाळण्यात आलं ही चांगली गोष्ट आहे. १३० कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी हा लॉकडाउन आवश्यक होता असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केलं की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. तसंच सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत. ते सगळ्यांनी अवलंबावेत असंही जावडेकर यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत जगभरात १६ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे थोडा त्रास झाला तर तो सहन केला तो आवश्यक आहे.
आवश्यक सेवांची दुकानं बंद होणार नाहीत. दूध, किराणा, रेशन, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकानं सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारं आहेत असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

************************************

💥पहिल्या टप्प्यातील जणगणना, एनपीआर प्रक्रिया ढकलली पुढे💥

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या २०२१ च्या जनणगणनेचा पहिला टप्पा तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीचे (एनपीआर) अद्यावतीकरणही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. केंद्रीय गृहखात्याने याची माहिती दिली आहे.
देशभरात १ एप्रिल २०१९ पासून जणगणना (२०२१) ची प्रक्रिया सुरु होऊन ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र, आता यातील पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. या प्रक्रियेदरम्यना जनतेला विवध प्रकारचे ३१ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. रजिस्ट्रार जनरल अथवा जणगणना आयुक्तांची याची अधिसूचना काढली होती.
दरम्यान, देशात २०२१ मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर केला जाईल, असं अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे, असं दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले. म्हणजेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे.

***********************************

💥 तुम्ही आयुष्यमान भारत योजनेत येता का ?💥

केंद्र सरकारची महत्वांक्षी योजना आयुष्मान भारत एक एप्रिल २०१८ पासून देशभरात लागू करण्यात आली आहे. या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएलधारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेचा १० कोटी बीपीएलधारक कुटुंब (सुमारे ५० कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असल्याचा दावा केंद्राकडून करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशात आताप्रर्यंत सात लाख ५६ हजार लोकांना ई-कार्डाची सुविधा मिळाली आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्येही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात या योजनेअंर्गत मोफत उपचार करू शकतात. तुमचं कुटुंब या योजनेसाठी पात्र असल्यास लवकरच CSC केंद्रात जाऊन या योजनेचं ई-कार्ड घ्या.
तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्याचं स्टेटस तुम्हाला माहित नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. सोप्या स्टेप्सद्वारे आम्ही याची माहिती तुम्हाला देणार आहोत. सध्या करोनाच्या प्रदुर्भावामुळे तुम्ही घरीच बसून राहा आणि तुमची कामं करून घ्या. जाणून घेऊयात आयुष्यमान भारत योजनचं स्टेटस आणि तुम्ही त्यास पात्र आहात का हे पाहण्याच्या सोप्या स्टेप्स…

– https://www.pmjay.gov.in/ या वेबपेजला भेट द्या…

– पेजवर गेल्यानंतर डाव्या बाजूला सर्वात वर Am I eligible या पर्यायावर क्लिक करा.

– नवीन पेज ओपन होईल. तुम्हाला मोबाइल क्रमांक मागितला जाईल.
– मोबाइल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि Generate OTP वर क्लिक करा.

– तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकून डेटा पॉलिसी तपासा.
– या सर्व प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा नवीन पेज ओपन होईल.

– Select State या पर्यायावरून तुम्ही राज्याची निवड करा.

– त्यानंतर कॅटेगरीची निवड करा. पुन्हा HHD नंबर, रेशनकार्ड नंबर आणि मोबाइल नंबर टाका. ज्याआधारे तुम्हाला तुम्ही आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र आहात का किंवा या योजनेचं स्टेटस समजेल.

आयुष्मान भारत योजना ऑनलाईन नोंदणी वेबसाइट - आयुष्मान भारत योजनेसाठी कोणतीही कर नोंदणी नाही. या योजनेनुसार ज्यांची नावे सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या यादी (एसईसीसी 2011) मध्ये नोंदविली गेली आहेत. केवळ ह्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असल्यास आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास. तो स्वत:चे नाव शासनाने केलेल्या अधिकृत शासकीय किंवा खासगी रुग्णालयात नोंदणी करू शकतो. याशिवाय आयुष्मान मित्राचीही मदत घेता येईल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या