💥बिड जिल्ह्यातील पत्रकार दत्तात्रेय काळे व महादेव शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला..!💥बिड जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील धर्मापुरी रोड वरील कोरोमंडल किंग सिमेंट कंपनीबाबत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार दत्तात्रेय काळे, महादेव शिंदे आदींना सिमेंट कंपनीच्या गेटवर अडवून अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. यानंतर अज्ञान व्यक्तींविरोधात येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या कोरोनाने जगात थैमान घातले आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने विविध वर्गांसाठी वेगवेगळ्या गाईडलाईन दिल्या आहेत. त्यांचे पालन कशा पद्धतीने केले जात आहे की नाही याबाबत वार्तांकन करण्यासाठी दै. मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, दै. युवासोबतीचे तालुका प्रतिनिधी महादेव शिंदे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी संभाजी मुंडे आदी माध्यम प्रतिनिधी दि. 20 मार्च रोजी सिमेंट कारखान्याला भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना कारखाना गेटवर अडवले गेले. तेव्हा तिथे उपस्थित कर्मचारी मंडळींना पत्रकारांनी विचारणा केली की आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी कशाप्रकारे घेत आहात? मास्क का लावला नाही? तेव्हा तिथे उपस्थित काही अज्ञात व्यक्तींनी तुम्ही आम्हांला प्रश्न विचारणारे कोण असे म्हणत अचानक हल्ला चढविला.

यात दत्तात्रेय काळे व महादेव शिंदे यांनी दुखापत झाली आहे. त्यांनंतर रात्री उशिरा पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम 2017 तथा भा. द. वि. कलम 323, 504, 506 व 34 तूर्तास अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिल्हा पोलीस उपाधीक्षक राहुल धस करत आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहे. दरम्यान सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

*_कोरोनाचा पत्रकारांना असाही फटका_*
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वत्र काळजी घेणे अनिवार्य आहे. परळीतील सिमेंट कारखान्यात देशातील अनेक भागांतून वाहने येत जात असतात. त्यामुळे इतर राज्यातील व्यक्ती लक्षणीय संख्येने ये जा करतात; त्यामुळे तिथे कशाप्रकारे प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत याचा लोकांच्या काळजीपोटी आढावा घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना समाजकंटक व्यक्तींनी मारहाण केली आहे. या नंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आरोपींवर त्वरित प्रतिबंधक कारवाई करण्याची मागणी होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या