💥आज दिनांक 17 मार्च च्या मध्य रात्री पासून तात्पुरत्या स्वरुपात प्लॉटफार्म तिकीट दर वाढविण्यात आले💥
कोरोना विषाणू चा संसर्ग सर्वत्र होत आहे. जनतेने कमीत कमी गर्दी करावी आणि या विषाणूचा संसर्ग रोकाण्यास सहकार्य व्हावे म्हणून दक्षिण मध्य रेल्वे च्या सर्व रेल्वे स्थानकावर प्लातफोर्म तिकिटांचे दर आज दिनांक 17 मार्च च्या मध्य रात्री पासून तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत.
यात जे रेल्वे स्थानक एन.एस.जी. 1 ते 4 मध्ये येतात त्या रेलवे स्थानकावर प्लातफोर्म तिकिटांचा दर आज दिनांक 17 मार्च च्या मध्य रात्री पासून रु. 50/- करण्यात आला आहे. तर जे रेल्वे स्थानक एन.एस.जी. 5 आणि 6 मध्ये येतात त्या रेल्वे स्थानकांचा प्लातफोर्म तिकिटांचा दर रु. 20/- करण्यात आला आहे.
या पूर्वी सर्व रेल्वे स्थानकावर प्लातफोर्म तिकिटांचा दर रु. 10/- होता.
प्लातफोर्म तिकिटांच्या किमती मध्ये करण्यात आलेला बदल दिनांक 31 मार्च-2020 पर्यंत राहील.
प्लातफोर्म तिकिटांच्या दरात हा बदल रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याकरिता करण्यात आला आहे, जनतेने रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री गजानन माल्या, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी केले आहे....
0 टिप्पण्या