💥लढा ‘कोरोना’ व्हायरसविरोधात धनंजय मुंडेंचे जनतेला आवाहन..!💥राज्य सरकार आपले कर्तव्य निभावत आहे, आपणही या युद्धात आपले कर्तव्य निभावू - मा.ना.धनंजय मुंडे

मुंबई :- देशात, तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारने महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी देखील जनतेला आवाहन केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून जनजागृतीला सुरुवात केली आहे. ‘राज्य सरकार आपले कर्तव्य निभावत आहे, आपणही या युद्धात आपले कर्तव्य निभावू…,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘कोरोना व्हायरस संबंधित उपाययोजनेचा आढावा घेणे, जनतेला परिस्थितीची माहिती देणे ही सर्वच कामे अत्यंत संयम व अभ्यासपूर्ण पद्धतीने सुरू आहेत,’ असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या