💥जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष एसपी कृष्णकांत उपाध्याय यांच्या विशेष पथकाने जप्त केला ३९ लाखांचा मुद्देमाल💥
परभणी/राज्यासह मोठ्या प्रमाणात फैलावत असलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने २१ दिवसांसाठी लॉकडाऊन संचारबदी घोषीत केली असतांना जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानकांतर्गत पोलीस प्रशासन संचारबंदी बंदोबस्तात असतांना या सर्व बाबींचा गैरफायदा घेत जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदी पात्रात रेती तस्करांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात गौण-खनीज रेतीचे उत्खनन करुन या चोरट्या रेतीचा स्टॉक करुन तस्करी करीत असल्याचे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांतजी उपाध्याय यांना समजताच त्यांच्या विशेष पथकाने आज २८ मार्च रोजी मध्यरात्री ०२-०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौ.धनगर टाकळी शिवारात धाडसी कारवाई करीत ११आरोपीं पैकी ७ ताब्यात घेत ७ मोबाईलसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.एवढेच नव्हे तर चोरट्या रेतीची अवैध वाहतूक करणारे सात टिप्पर आणि एक मोटर सायकल देखील हस्तगत केली एवढेच नव्हे तर 11 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रेती तस्करांच्या विरोधात झालेली ही धाडसी कारवाई जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री उपाध्याय यांच्या आदेशानुसार सपोनी हनमंत पांचाळ,सपोउपनी, हनमंत कच्छवे, जगदीश रेड्डी,श्रीकांत घनसावंत, अतुल केंद्रे गजेंद्र चव्हाण,सोळंके,पठाण,लटपटे,यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास छापेमारी केली.
0 टिप्पण्या