💥शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आपआपल्या घरांमध्ये थांबून 'जनता कर्फ्युला' दिली साथ💥
पुर्णा/शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातल्या नागरिकांनी 'जनता कर्फ्युला' उस्फुर्त प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कोरोना विषाणू संसर्ग विरोधी लढ्याला पाठींबा दिल्याचे आज रविवार दि.२२ मार्च २०२० रोजी आयोजित 'जनता कर्फ्यु' यशस्वी करण्याच्या उद्देशाने आपणे सर्व व्यवसायीक प्रतिष्ठान शंभर टक्के बंद ठेवून आपआपल्या घरातच थांबून आपणही या कोरोना विषाणू विरोधी जागतिक युध्दात सहभागी असल्याचे सिध्द केले.
जनसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'जनता कर्फ्यु' ला पुर्णा शहरासह ग्रामिण भागातही खूप मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असून जनता कर्फ्यु असल्यामुळे नागरिकांक आज सकाळ पासुनच घराच्या बाहेर निघले नाही.त्यामुळे आज शहरातील तसेच ग्रामीण भागातील ही किराणा दुकाने,इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनीक दुकान,पान टपऱ्या,आदींसह विविध व्यवसायीक प्रतिष्ठान संपूर्णपणे बंद असल्याने व्यापारपेठेत शुकशुकाट दिसत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यु' चे आवाहन केले होते.आज संपूर्ण देशामध्ये सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजता पर्यंत घराबाहेर पडू नये,
कोणाच्याही संपर्कात येऊ नये,कोरोना वायरस पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या घरा मध्येच सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले होते.या सुचनांचे नागरिक पालन करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे.पुर्णा नगर परिषद आरोग्य विभागाकडून पोलिस विभागाकडुन जनतेला घरातच थांबन्याचे आवाहन करण्यात येत आहे शहरातील सर्व नागरिकांनी घराबाहेर येऊ नये आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन शहाराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.गंगाबाई एकलारे,उपनगराध्यक्ष तथा परभणी जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम,समाजसेवक तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,काँग्रेस पक्षाचे नगर सेवक तथा आरोग्य व स्वच्छता सभापती ॲड.हर्षवर्धन गायकवाड,शिवसेना नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती ॲड.राजेश भालेराव,मा.उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उत्तम खंदारे,मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हाजी कुरेशी,भाजप मा.तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बाळू कदम,भाजप शहराध्यक्ष डॉ.अजयसिंह ठाकूर,युवासेना शहराध्यक्ष विकास वैजवाडे,युवासेना सरचिटणीस विद्यानंद तेजबंद,युवा नेता राज नारायनकर,पुर्णेचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले,पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलीस निरिक्षक भुमे यांनी नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने घराबाहेर न येण्याचे आवाहन केले आहे.असून पुर्णा पोलीस प्रशासना मार्फत कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने गस्त घालण्यात येत आहे..
0 टिप्पण्या