💥पुर्णा न.पा.तील अग्निशमन दल व सफाई कर्मचाऱ्यांना मास्क,हॅन्ड गोल्ज व सॅनिटायजरचे वाटप...!💥शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगर परिषद उपाध्यक्ष विशाल कदम यांचे कौतुकास्पद कार्य💥

पुर्णा/ कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पुर्णा नगर परिषदेतील स्वच्छता रक्षक अधिकारी/कर्मचाऱ्यांना तसेच अग्निशमन दलातील कर्मचारी बंधू-भगिनींना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्याकरिता आज गुरुवार दि.२६ मार्च रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा पुर्णा नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्य विशाल कदम यांनी मास्क,हॅन्ड गोल्ज व सॅनिटायजरचे वाटप केले.तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नगर परिषद स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी त्यांनी जंतूनाशकांची फवारणी करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला नागरिकांनी घरात बसून पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या