💥कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी घेतला कठोर निर्णय💥
परभणी/संपूर्ण देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून महाराष्ट्रात हीं कोरोणा विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्र नंबर एकवर येत असल्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात या कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी प्रशासन प्रत्येक खबरदारी घेत आहे.परभणी जिल्ह्यात पुणे मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत असून बाहेरील जिल्ह्यासह पुणे-मुंबई येथून आलेल्या लोकांची तपासणी करणे शक्य होत नसल्याने प्रशासना कडून जिल्हा बॉर्डर बंदी घालण्याची शक्यता वर्तविली जात होती.
परभणी जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाता कामा नयें याकरिता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दि.म.मुगळीकर यांनी आज दि.२३ मार्च ते दि.३१ मार्च २०२० पर्यंत जिल्हा बॉर्डर सील करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.
परभणी जिल्ह्यातील संशयित रुग्णांची संख्या पन्नासच्या वर ओलांडली असून आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे याचे एकमेव कारण म्हणजे बाहेर जिल्ह्यातून परत येणाऱ्याची संख्या ही बाब समोर येत आहे ,तेव्हा प्रशासनाकडून पुढील पाऊल उचलण्यासाठी जिल्हा बॉर्डरवरच लोकांना अडवून जिल्ह्यात येण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे...
0 टिप्पण्या