💥पुर्णा तालुक्यात नोवेल कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यास पोलीस प्रशासन प्रयत्नशील...!


💥मुंबई-पुणे बाधीत क्षेत्रातून परतलेल्या होम क्वॉरंटाईन स्टँम्पींग केलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नए💥  

💥संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई - श्रीकृष्ण कर्डीले डिवायएसपी

पुर्णा/जागतिक पातळीवर भयंकर महामारी म्हणून उदयास आलेल्या नोवेल कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार शासकीय पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ट करीत आहे.पाहाता पाहाता संपूर्ण जगासह आमच्या देशासह राज्यातही या कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी मानवी साखळी तोडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी काल सोमवार दि.२३ मार्च २०२० रोजी पहाटे ०५-०० वाजेपासुन ते दि.३१ मार्च २०२० रोज मध्यरात्री पर्यंत जमावबंदी कलम १४४ लागू केला तर २३ मार्च २०२० च्या दुपारी १२-०० वाजेपासून ते ३१ मार्च २०२० च्या मध्यरात्री पर्यंत संपूर्ण राज्यात जिल्हा सिमाबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व शासनाच्या या जनहीतवादी निर्णयाचे परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील ही नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले व पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.गोवर्धन भुमे हे सातत्याने नागरिकांना करतांना दिसत असतांना ही टवाळखोरांचे टोळके संचारबंदी जमावबंदीचे उल्लंघन करुन कोरोना विषाणू संसर्गाला निमंत्रण देण्याचा मुर्खपणा करीत आहे.याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे पुर्णा तालुक्यातून रोजगार मिळवण्यासाठी मुंबई-पुणे आदी कोरोना विषाणू बाधीत क्षेत्रात गेलेल्या व कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढल्या नंतर वापस आपल्या गावांकडे आलेल्या व विलगीकरणासाठी होम क्वॉरंटाईन स्टँम्पींग केलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नए असे आरोग्य विभागासह शासनाचे सक्तीचे आदेश असतांना सदरच्या होम क्वॉरंटाईन व्यक्ती ही सर्रास घराबाहेर फिरतांना पाहावयास मिळत आहेत अश्या व्यक्ती बाहेर फिरतांना आढळून आल्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्यती कारवाई होईल तसेच आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन कक्षात अश्या होम क्वॉरंटाईन व्यक्तींना सक्तीने ठेवण्यात येईल असे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या